शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

रमाई घरकूल योजनेसाठी महापालिकेत निधीची वानवा

By admin | Updated: November 17, 2015 00:23 IST

रमाई घरकूल योजनेसाठी निधीची वानवा असून महापालिकेने शासनाकडे २० कोटी रुपये अनुदान मागणीचा प्रस्ताव पाठविला आहे.

हजारो लाभार्थ्यांचे प्रस्ताव : शासनाक डे २० कोटींची मागणीअमरावती : रमाई घरकूल योजनेसाठी निधीची वानवा असून महापालिकेने शासनाकडे २० कोटी रुपये अनुदान मागणीचा प्रस्ताव पाठविला आहे. मात्र घरकुलाचे अनुदान मिळावे, यासाठी लाभार्थ्यांचे हजारो प्रस्ताव पडून आहेत. तर दुसरीकडे समाज कल्याण विभागाने जुने अनुदान खर्च झाल्याशिवाय नवीन अनुदान मिळणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. नवबौद्ध व अनुसूचित जाती घटकातील लाभार्थ्यांना घरकूल योजनेचा लाभ मिळत आहे. राज्य शासनाने ही योजना लागू करताना पहिल्या टप्प्यात विधवा, घटस्फोटीत महिलांना प्राधान्य दिले आहे. दोन लाख रुपयातून घरकूल साकारण्याचे प्रस्तावित आहे. मात्र लाभार्थी हे नवबौद्ध, अनुसूचित जाती समुहासोबत बीपीएल यादीत असणे अनिवार्य आहे. या अटी, शर्थी पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांनाच रमाई आवास योजनेचा लाभ दिल्या जात आहे. मात्र काही महिन्यांपासून निधी उपलब्ध नसल्यामुळे घरकूल लाभाचे प्रस्ताव येऊनही ते निधीमुळे मंजूर करता येत नाही, अशी माहिती आहे. प्राप्त प्रस्तावातून ४५० लाभार्थ्यांची यादी योग्यरित्या तपासून ती मंजुरीसाठी तयार आहे. या यादीला बैठकीत मान्यता मिळाली की, संबंधित लाभार्थ्यांना अनुदान वाटप केले जाणार आहे. यापूर्वी २१०० लाभार्थ्यांना घरकुलाचे अनुदान देण्यात आले आहे. नव्याने १८५० घरकुलांचे प्रस्ताव वजा अर्ज महापालिकेत दाखल आहेत. अनुक्रमानुसार लाभार्थ्यांना अनुदान वितरित करण्याचे धोरण आहे. ज्या लाभार्थ्यांचे कागदपत्र व्यवस्थित आहे, अशांना प्राधान्यक्रम दिले जाणार आहे. निधी प्राप्त होताच लाभार्थ्यांना अनुदान देऊन घरकुलाचा लाभ देण्याचे प्रस्तावित आहे. घरकूल लाभासाठी नवीन यंत्रणा नेमण्यात आली आहे. या यंत्रणेमार्फत घरकूल संदर्भात जागेची चाचपणी, कागदपत्र गोळा केली जात आहे. मात्र नवीन यंत्रणेमुळे घरकूल योजनेच्या कामाला खिळ बसल्याचा आरोप बहुतांश सदस्यांचा आहे. (प्रतिनिधी)अकोला महापालिके तून आठ कोटी अप्राप्तरमाई घरकूल योजनच्या अंमलबजावणीसाठी शासनाने अकोला महापालिकेला दिलेले आठ कोटी रुपये अखर्चिक आहेत. त्यामुळे हे आठ कोटी रुपये अनुदान अकोला महापालिकेने अमरावतीला वळती करावे, असे पत्र समाज कल्याण विभागाने अकोला महापालिकेला दिले आहे. मात्र अद्यापपर्यंत ही रक्कम अमरावती महापालिकेला मिळाली नसल्याची माहिती आहे. नवीन घरकुलांच्या प्रस्तावानुसार शासनाक डे २० कोटी रुपयांची मागणी महापालिकेने केली आहे.महापालिकेला आतापर्यंत ४० कोटी मिळालेघरकूल योजनेसाठी समाज कल्याण विभागाने अमरावती महापालिकेला आतापर्यंत ४० कोेटी रुपयांचे अनुदान दिले आहे. त्यापैकी स्थानिक दस्तूरनगर शाखेतील देना बँकेच्या शाखेत ७ कोटी, ३६ लाख, ७८२ रुपये शिल्लक आहे. समाज कल्याण विभागाकडून उपयोगिता प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय नवीन अनुदान मिळणार नाही. तर दुसरीकडे रमाई घरकूल योजनेसाठी बँकेत अनुदान शिल्लक असताना ते जमा कशासाठी ठेवले जाते, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते पंकज मेश्राम यांनी महापालिका प्रशासनाला केला आहे.घरकुलाचे आॅनलाईन १८५० अर्ज सादर झाले आहेत. त्यापैकी ४५० अर्जांची छाननी झाली आहे. अनुक्रमे लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळेल. निधी उपलब्ध असून मंजूर समितीची बैठक होताच प्रश्न मार्गी लागेल.- रवींद्र पवार, उपअभियंता, दलित वस्ती सुधार विभाग.