शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

पुनर्रचनेच्या शक्यतेमुळे सदस्यांना भरली धडकी

By admin | Updated: June 13, 2016 01:21 IST

जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींना नगरपंचायतींचा दर्जा दिल्याने तसेच तेथील लोकसंख्येत बदल झाल्याने निवडणूक आयोगाला

जिल्हा परिषद : निवडणुकीचे रोस्टर आॅगस्टमध्ये, समीकरण बदलणार जितेंद्र दखने अमरावतीजिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींना नगरपंचायतींचा दर्जा दिल्याने तसेच तेथील लोकसंख्येत बदल झाल्याने निवडणूक आयोगाला मतदारसंघाची पुनर्रचना करावी लागणार आहे. मात्र, पुनर्रचना झाल्यास काय होणार? या विचाराने निवडणूक लढविण्यास इच्छूक जिल्हा परिषद सदस्यांना धडकी भरली आहे. नगर पंचायतींची रचना झाल्याने येणाऱ्या निवडणुकीत परिस्थिती पूर्णपणे बदलली असल्याने मतदारसंघांची पुनर्रचना करणे आवश्यक आहे. मागील निवडणुकीत आॅगस्टमध्ये सदस्यांचे आरक्षण जाहीर झाले होते. त्यामुळे यंदाही त्यावेळी आरक्षणावर निर्णय होऊ शकतो. राज्यातील २६ जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर झाले असल्याने आता स्थानिक सदस्यांचेही आरक्षणाकडे लक्ष लागले आहे. जुलै किंवा आॅगस्टमध्ये सदस्यांच्या जागांसाठी आरक्षणाची सोडत निघण्याची शक्यता आहे. अमरावती जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जाती प्रवर्गातील व्यक्ती विराजमान होणार आहे. अध्यक्षपद कुणाच्या वाट्याला जाते, याची उत्सुकता सर्वांनाच होती. आता अनुसूचित जाती प्रवर्गातील व्यक्ती झेडपीचे अध्यक्षपद भूषविणार आहे. दरम्यान जि.प. सदस्यांनी आरक्षणाची पडताळणी सुरू केली आहे. पती-पत्नी पैकी कोणासाठी उमेदवारी मिळवायची, या राजकारणात काही जण आतापासूनच व्यस्त झाले आहेत. जिल्हा परिषदेची सदस्य संख्या ५९ आहे. आता जिल्ह्यात धारणी, तिवसा, नांदगाव खंडेश्वर, भातकुली येथील ग्रामपंचायतींना नगरपंचायतींचा दर्जा देण्यात आला आहे. यामुळे जिल्हा परिषदेचे चार मतदारसंघ कमी होऊ शकतात, असा दावा सदस्यांनी केला आहे तर सन २०११ च्या जनगणनेनुसार आरक्षणाची सोडत निघाल्यास वेगळी स्थिती उत्पन्न होऊ शकते, अशी शक्यता देखील काही लोक व्यक्त करीत आहेत. मात्र, आरक्षणाच्या पिटाऱ्यातून काय निघते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.