दर निश्चित : निवासी ४०, औद्योगिक ६०, वाणिज्य ८० टक्केअमरावती : शासन निर्णयानुसार शहरात विकास नियंत्रण नियमावलीमध्ये अधिमूल्य आकारुन अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक अनुज्ञेय (एफएसआय) लागू करण्याला शनिवारी मंजुरी मिळाली. सहा मीटरपर्यंत रस्ते असलेल्या ले- आऊटमधील विद्यमान बांधकामांचा यात समावेश करण्यात आला आहे. परंतु नव्याने ले-आऊटला मान्यता देताना आता किमान ९ ते १२ मिटरचे रस्ते अनिवार्य राहील. याअनुषंगाने ठराव मंजूर करुन तो शासन निर्णयासाठी पाठविण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात महापौर चरणजितकौर नंदा यांच्या अध्यक्षस्थानी पार पडलेल्या स्थगित विशेष सभेला जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किरण गित्ते, नगरसचिव मदन तांबेकर यांनी कामकाजात सहभाग नोंदविला.असे ठरले एफएसआयचे नवीन दरशनिवारी पार पडलेल्या विशेष सभेत सदस्यांच्या चर्चेअंती एफएसआयला मंजुरी देताना अतिरिक्त बांधकाम नियमसंगत करुन घेण्यासाठीचे दर निश्चित करण्यात आले. यात निवासी ४० टक्के, औद्योगिक ६० तर वाणिज्य बांधकामांना ८० टक्के दर लागू करण्याचा एकमताने ठराव मंजूर करण्यात आला.आता नऊ मीटरच्या रस्त्यांनाच मंजुरीमहापौर चरणजितकौर नंदा यांनी एफएसआय या प्रस्तावाला मंजुरी देताना ६ जून २०१५ पासून ९ मीटरच्या रस्त्याशिवाय नवीन लेआऊटला मान्यता मिळणार नाही, असे स्पष्ट केले. निवासी ४० टक्के, औद्योगिक ६० तर वाणिज्य क्षेत्रासाठी ८० टक्के एफएसआय दर लागू करण्याचा निर्णय महापौरांनी दिला.
एफएसआयला मंजुरी
By admin | Updated: June 7, 2015 00:30 IST