शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

स्थायीसाठी मोर्चेबांधणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2016 00:52 IST

महापालिकेत वजनदार समिती म्हणून नावारुपास आलेल्या स्थायी समितीत नव्याने आठ सदस्य हे मंगळवारी २३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ...

काँग्रेसमध्ये जंबो यादी : राकाँ, भाजप-सेना, बसपा, जनविकासमध्ये स्पर्धाअमरावती : महापालिकेत वजनदार समिती म्हणून नावारुपास आलेल्या स्थायी समितीत नव्याने आठ सदस्य हे मंगळवारी २३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या आमसभेत नियुक्त केले जाणार आहे. स्थायी समितीत सदस्य म्हणून निवड व्हावी, यासाठी नगरसेवकांमध्ये जोरदार स्पर्धा असून नेत्यांची मनधरणी केली जात आहे.पुढील वर्षी फेब्रुवारीत होऊ घातलेल्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जून २०१६ पासून वॉर्ड रचनेला प्रारंभ होणार आहे. हे वर्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी फ्रंट, भाजप, सेना, बसपा, रिपाइं व जनविकास काँग्रेसमध्ये स्थायी समितीत प्रवेशासाठी नगरसेवकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. एकदा स्थायी समितीत प्रवेश मिळाला की सभापती पदासाठी ‘फिल्डींग’ लावणे सोपे जाते, हे अपेक्षित ठेवून अनेकांनी नेत्यांची मनधरणी चालविली आहे. स्थायी समितीत नगरसेवकांचे सदस्य म्हणून नावांची नियुक्ती करण्यासाठी गटनेत्यांचे पत्र आवश्यक आहे. गटनेत्यांने दिलेल्या पत्रानुसार सर्वसाधारण सभेत महापौर सदर नावांची घोषणा करून स्थायी समितीत सदस्य म्हणून निवड करतात. स्थायी समिती ही मलईदार असल्यामुळे बहुतांश नगरसेवक हे या समितीत प्रवेशासाठी जीवाचे रान करीत असल्याचे चित्र काही दिवसांपासून महापालिकेत दिसून येत आहे. काँग्रेसमध्ये स्थायी समितीत सदस्य म्हणून प्रवेशासाठी नगरसेवकांची जंबो यादी आहे. पक्षनेता बबलू शेखावत यांच्या दालनात स्थायी समितीत प्रवेशासाठी दरदिवसाला नगरसेवकांचा ठिय्या ही नित्याचीच बाब होती. काँग्रेसमधून स्थायी समितीत सदस्य म्हणून माजी आ. रावसाहेब शेखावत यांचा निर्णय अंतिम राहील, अशी माहिती आहे. मात्र गत आठवड्यात काँग्रेसचे निरीक्षक गणेश पाटील, रामकृष्ण ओझा यांनी स्थायी समितीत सदस्य निवडीच्या अनुषंगाने काँग्रेस नगरसेवकांची मते जाणून घेतली आहेत. हल्ली काँग्रेसमधून नियमानुसार सभापती विलास इंगोले व योजना रेवस्कर हे दोन सदस्य बाहेर पडतील. मात्र काँग्रेसमध्ये स्थायी समितीत सदस्य नियुक्तीसाठी ८ ते १० जण इच्छुक आहेत. हीच परिस्थिती राष्ट्रवादी फ्रंटमध्ये असून वंदना हरणे, सारिका महल्ले हे दोन सदस्य बाहेर पडणार आहेत. परंतु राष्ट्रवादी फ्रंटमधून नव्याने पाच ते सहा नगरसेवक स्थायी समितीत नियुक्तीसाठी संजय खोडके यांच्याकडे लॉबींग करीत आहेत. भाजप, सेना, रिपाइं, बसपा, जनविकास काँग्रेसमध्ये देखील स्थायी समितीत सदस्य नियुक्तीसाठी स्पर्धा आहे. नेमके कोणाची वर्णी लागते, हे २३ फेब्रुवारी रोजी स्पष्ट होईल. ु काँग्रेसमध्ये स्थायी समितीत निवड करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे माजी आ. रावसाहेब शेखावत यांना जे नाव सांगतील तेच नावे पाठविली जातील अशी माहिती आहे.