शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

डिसेंबरमध्ये थेट मोदींच्या घरावर मोर्चा

By admin | Updated: September 2, 2016 00:13 IST

शेतकरी, शेतमजुरासाठी स्वामीनाथन आयोग लागू करा, शेतमालाला रास्त भाव द्या, अपंगाचा शेष भरून काढा...

बच्चू कडूंची घोषणा : अंबाड्यात जाहीरसभा, लक्षणीय उपस्थितीअंबाडा : शेतकरी, शेतमजुरासाठी स्वामीनाथन आयोग लागू करा, शेतमालाला रास्त भाव द्या, अपंगाचा शेष भरून काढा या मागणीसाठी ३१ डिसेंबर २०१६ ला गुजरातमधील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या घरावर मोर्चा नेणार असल्याची घोषणा आ. बच्चू कडू यांनी येथे सोमवारी आयोजित जाहीरसभेत केली.सभेच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच रवींद्र लकडे होते. यावेळी मंचावर माजी जि.प. सदस्य अनिल खांडेकर, धोटे, श्रीवास, मुरलीधर पिसे, ज्ञानेश्वर कडू, ज्ञानेश्वर कोकरे, हारुणभाई, उपसरपंच रेखा कोकरे, मंजुषा खांडेकर आदी उपस्थित होते.यावेळी समाजसेवक मुरलीधर पिसे यांचा सन २०१६ मध्ये शासनातर्फे घोषित डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल संघर्ष बहुउद्देशीेय संस्थतर्फे गौरव करण्यात आला. आ. बच्चू कडू पुढे म्हणाले की, भगवा, निळा आणि हिरव्या झेंड्याखाली राजकीय नेते शेतकऱ्यांची अडवणूक करतात. जातीधर्माचे राजकारण करून जातीधर्मात भांडणे लावतात. शेतकरी सुद्धा यात होरपळतो. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही. त्यांच्यापर्यंत शासकीय योजना पोहोचत नाही. शेतकऱ्यांच्या कापसाला सात हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला पाहिजे, असे स्वामीनाथन आयोगात सरकारने म्हटले आहे. पण कापसाला ४५०० रुपये भाव देवून शेतकऱ्यांची पिळवणूक केली जाते. यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शासनाविरोधात लढ्या द्यावा, मी तुमच्या सोबत आहे, असेही आ. कडू म्हणाले. संचालन संतोष बिजवे यांनी तर आभार प्रदर्शन पुरुषोत्तम खोब्रागडे यांनी केले. कार्यक्रमासाठी गजानन देशभ्रतार, राजू कोकरे, नितीन खोडस्कर, अनिल पठाण, दीपक घाटोळ यांनी प्रयत्न केले. या सभेला पसिरातील ग्रामस्थांची लक्षणीय उपस्थिती होती. बच्चू कडूंनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.(वार्ताहर)