शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 01:51 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी येथील उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी शासनाकडे पाठविण्यासाठी विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

ठळक मुद्देएकजुटीचे दर्शन : सातव्या वेतन आयोगाची मागणी तीव्र

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी येथील उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी शासनाकडे पाठविण्यासाठी विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. दरम्यान, विद्यापीठातील महिला, पुरुष कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून एकजुटीचे दर्शन घडविले.सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार त्रुटीरहित सुधारित वेतन संरचना लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील विद्यापीठांमधील कर्मचाºयांनी शासनाविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे कार्याध्यक्ष तसेच संत गाडगेबाबा विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्यक्ष अजय देशमुख यांच्या नेतृत्वात विद्यापीठ कर्मचारी सध्या सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी लढा देत आहेत. या आंदोलनामध्ये विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी संघ, आॅफिसर्स फोरम, तसेच विद्यापीठ मागासवर्गीय कर्मचारी संघटना सहभागी झाल्या आहेत. सर्व संघटनांनी एकत्र येऊन हे आंदोलन सुरू केले असल्यामुळे ही लढाई दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. संघटनेचे अध्यक्ष अजय देशमुख, महासचिव विलास सातपुते, उपाध्यक्ष नीलेश वंदे, आॅफिसर्स फोरमचे अध्यक्ष शशिकांत रोडे, सचिव विलास नांदूरकर, मागासवर्गीय संघटनेचे अध्यक्ष नितीन कोळी, संतोष मालधुरे, संजय एरंडे, प्रफ्फुल ठाकरे, मंगेश वरखेडे, सुनीता मंगरूळकर, सतीश लोखंडे, संजय रामबोले, मनीष शास्त्री, दिलीप विधळे, दिलीप पाटील, नरेंद्र घाटोळ, प्रफुल्ल ठाकरे, स्मिता साठे, दिलीप काळे, पूनम जाधव, अनुपमा कळसकर, सविता खंडारे, संतोष मालधुरे, रामभाऊ भुगूल, मंजुश्री देशमुख, दादाराव चव्हाण, प्रवीण राठोड आदींनी आंदोलनात सहभाग नोंदविला आहे. आंदोलनाच्या पुढील टप्प्यात पुणे येथील उच्चशिक्षण संचालनालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानंतर २९ जून रोजी एकदिवसीय लाक्षणिक संप पुकारला जाईल. शासनाने मागण्या मंजूर न केल्यास जुलै महिन्यात बेमुदत संप पुकारण्याचा इशारा दिला आहे.व्हीएमव्ही ते उच्चशिक्षण कार्यालयादरम्यान मोर्चाअमरावती विद्यापीठ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी थेट विद्यापीठातून मोर्चाचे आयोजन के ले होते. मात्र, विद्यापीठ ते शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेपर्यंत कर्मचारी वाहनांनी पोहोचले. त्यानंतर व्ही.एम.व्ही. ते उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालयादरम्यान मोर्चा काढण्यात आला. सहसंचालक संजय जगताप यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

टॅग्स :Morchaमोर्चा