शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मित्राचा मेसेज करू शकतो फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 23:09 IST

अमरावतीकरांच्या मोबाईलवर सध्या एका संदेशाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. तुमच्या मित्राने तुमच्या खात्यात एक हजार रुपये जमा केल्याचा तो संदेश आहे. मात्र, या संदेशातील इंटरनेट लिंकवर आपण संपर्क केल्यास आपली फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावध रहा, या संदेशानंतर काही दिवसांत अनोळखी क्रमांकांवरून कॉल आल्यास ओटीपी शेअर करू नका, आपल्या बँक खात्याविषयी माहिती देऊ नका, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

ठळक मुद्देसायबर गुन्हेगारांचा नवा फंडा : ओटीपी शेअर करू नका, बँक डिटेल देऊ नका

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अमरावतीकरांच्या मोबाईलवर सध्या एका संदेशाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. तुमच्या मित्राने तुमच्या खात्यात एक हजार रुपये जमा केल्याचा तो संदेश आहे. मात्र, या संदेशातील इंटरनेट लिंकवर आपण संपर्क केल्यास आपली फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावध रहा, या संदेशानंतर काही दिवसांत अनोळखी क्रमांकांवरून कॉल आल्यास ओटीपी शेअर करू नका, आपल्या बँक खात्याविषयी माहिती देऊ नका, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.गेल्या काही दिवसांपासून अनेकांच्या मोबाईलवर बीडब्ल्यूजीएफवायएनडी यांच्याकडून संदेश प्राप्त होत आहे. तुमचा मित्र एक्सवायझेडने तुमच्यासाठी एक हजार रुपये एफवायएनडीमध्ये जमा केले आहे. त्यासाठी कोड एक्सओएमएमएफएल वापरा. त्यासाठी पाठविलेली लिंक डाऊनलोड करा, असा तो संदेश आहे. हा संदेश प्राप्त झालेल्यांना आपल्या मित्राने पैसे पाठविल्याचे वाटू लागते. त्यामुळे संबंधित मोबाईलधारक त्या लिंकवर क्लिक करून लिंकमध्ये सांगितल्याप्रमाणे पुढे जातो. मात्र, ही बाब आपली फसवणूक करणारी ठरू शकते, असे सायबर एक्सपर्टचे म्हणणे आहे. अशाप्रकारचे संदेश हे फसवे असल्याची माहिती सायबर एक्सपर्ट देत आहे. अशा लिंक डाऊनलोड केल्यास तुमच्या मोबाईलमधील संपूर्ण डेटा सायबर गुन्हेगारापर्यंत पोहोचतो. या माहितीच्या आधारे तुमच्या बँक खात्यातील पैसे काढण्यापर्यंत उपयोगी पडू शकतो. सायबर गुन्हेगार या डेटाच्या माध्यमातून आपल्या बँकेच्या तिजोरीवर डल्ला मारू शकतात. त्यामुळे अशा संदेशांवर क्लिक न करता ते थेट डिलीट करणेच योग्य राहील.अशी होते फसवणूकअसे संदेश कुणाला आले असतील, तर या लिंकवर क्लिक करू नये, हा फिशिंग संदेश आहे. लिंकवर क्लिक केल्यास आपल्या मोबाईलमधील संपूर्ण माहिती सायबर गुन्हेगार घेऊ शकतात. त्याचा उपयोग घेऊन ते आपली फसवणूक करू शकतात. त्यामुळे अशा संदेशापासून सावध रहा, अनोळखी क्रमांकांवरून कॉल आल्यास ओटीपी क्रमांक किंवा बँक खात्याविषयी माहिती देऊ नका, असे आवाहन सायबर ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कांचन पांडे व पोलीस उपनिरीक्षक ईश्वर वर्गे यांनी केले.या लिंकवर क्लिक केल्याचा परिणामया संदेशातील लिंकवर क्लिक केल्यास, अ‍ॅप्लिकेशन इन्स्टॉल सांगितले जाते. नंतर परवानगी अलाऊ करण्यास सांगितले जाते. ज्यामध्ये आपले संपर्क क्रमांक (कान्टेक्ट), लोकेशन, फोन, स्टोअरेज आणि अन्य माहिती या अ‍ॅप्लीकेशनच्या माध्यमातून डेव्हलेपरकडे सेव्ह होते. त्या सर्व संपर्क क्रमांकावर हा संदेश जातो.