शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

नऊ वीरपत्नींना मोफत प्रवास सवलत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 23:50 IST

देशासाठी प्राणाची आहुती दिलेल्या शहिदांच्या पत्नींचा राज्य परिवहन महामंडळाने अनोख्या पद्धतीने सन्मान केला. महाराष्ट्र दिनापासून वीरपत्नींना आजीवन मोफत प्रवास सवलत देण्यात आली आहे.

ठळक मुद्देएसटीचा सलाम : पाच जणींना वाटप, चौघींना घरपोच लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : देशासाठी प्राणाची आहुती दिलेल्या शहिदांच्या पत्नींचा राज्य परिवहन महामंडळाने अनोख्या पद्धतीने सन्मान केला. महाराष्ट्र दिनापासून वीरपत्नींना आजीवन मोफत प्रवास सवलत देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील नऊ वीरपत्नींना मंगळवारपासून ही सुविधा लागू करण्यात आली आहे.राज्य परिवहन महामंडळाच्या अमरावती विभागातर्फे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनांतर्गत मोफत प्रवास पासचे वितरण महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी पठारे व विभाग नियंत्रक श्रीकांत गभणे यांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते सुनीता प्रभाकर म्हसांगे, कांताबाई शंकर सांगोले, रेणुका प्रकाश धांडे, सरस्वती ओंकार मासोदकर, इंदुमती तेजराव दंदी यांना एका समारंभात पासचे वितरण करण्यात आले.अधिकारी पोहोचले लाभार्थींच्या घरीप्रातिनिधिक स्वरूपात पाच जणींना मंगळवारी ओळखपत्र देण्यात आले. गुंफाबाई मुरलीधर कोलसाईत, नूतन नंदकिशोर खांडेकर, वनमाला रामदास गेठे, मनू सुनील चौहान या उर्वरित लाभार्थींना घरी जाऊन सन्मानपूर्वक ओळखपत्र देत असल्याची माहिती श्रीकांत गभने यांनी दिली.