शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

उद्यापासून रेशन दुकानात १.२७ लाख साड्यांचे मोफत वाटप!

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: March 5, 2024 23:35 IST

होळीचा रंग होणार गडद : दोन दिवसांपूर्वीच तालुक्यांच्या गोदामात पोहोचले गठ्ठे

अमरावती : जिल्ह्यातील १,२७,४६५ अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना प्रतिवर्ष, प्रतिकुटुंब एक साडी रेशन दुकानातून मोफत मिळणार आहे. याबाबतचा निर्णय अन्न व नागरी पुरवठा विभागाद्वारे २५ जानेवारीला घेतला होता. प्रत्यक्षात साडीचे गठ्ठे दोन दिवसांपूर्वी तालुक्यांच्या गोदामात पोहोचले आहेत. त्यामुळे बुधवारपासून या मोफत साड्यांचे वाटप सुरू होणार असल्याने होळीचा रंग गहिरा होणार आहे.

कॅप्टिव्ह योजनेंतर्गत अंत्योदय रेशनकार्डधारक प्रत्येक कुटुंबाला ई-पॉस मशीनद्वारे एका साडीचे वाटप करण्यात येणार आहे. २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन) ते २४ मार्च (होळी) या दरम्यान या मोफत साड्यांचे वाटप करण्यात येणार असल्याचे पुरवठा विभागाने स्पष्ट केले होते. प्रत्यक्षात या साड्यांच्या गाठी (१०० साड्या/वजन ४१ ते ४६ किलो) दोन दिवसांपूर्वी संबंधित गोदामापर्यंत पोहोचल्या असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाने मंगळवारी दिली.

साठवणूक व हाताळणी करतांना साड्या खराब होणार नाहीत, याची दक्षता घेण्याची सूचना पुरवठा विभागाने केलेली आहे. या योजनेसाठी शासनाने राज्य यंत्रमाग महामंडळाची नोडल संस्था म्हणून नेमणूक केलेली आहे.

तालुकानिहाय लाभार्थीपुरवठा विभागाच्या माहितीनुसार अचलपूर तहसील कार्यालयास ६५३८, अमरावती ५८९८, मोर्शी ८०४६, अंजनगाव सुर्जी ६१४४, भातकुली ४५९५, चांदूर रेल्वे ४०९३, चांदूरबाजार ८२९५ चिखलदरा २०३९५, दर्यापूर ६३७९, धामणगाव ५३५५, धारणी २६,०२६, नांदगाव ५२३९, तिवसा ४३०१, वरुड ८२१८ व अमरावती एफडीओ कार्यालयास ७९४३ साड्या वाटपाचे उद्दिष्ट आहे.

रेशन नेण्यासाठी सरकारी पिशवी पोहोचलीच नाहीप्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना १० किलोची क्षमता असलेली एक पिशवी रेशन दुकानातून मोफत देण्यात येणार असल्याचे पुरवठा विभागाने ८ जानेवारीला स्पष्ट केले होते. सहा महिन्यांच्या अंतराने एक पिशवी अशी ही योजना आहे. देण्यात येणाऱ्या या पिशव्यांचा ठावठिकाणाच नसल्याचे दिसून येते.

जिल्ह्यातील प्रत्येक अंत्योदय कुटुंबास रेशन दुकानातून बुधवारपासून एक साडी मोफत मिळेल. साड्यांचे गठ्ठे सर्व तालुक्यांना पोहोचले आहेत.- प्रज्वल पाथरेसहायक जिल्हा पुरवठा अधिकारी

टॅग्स :Amravatiअमरावती