शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

वडाळीच्या नर्सरीत मादी बिबट्याचा पिलासह मुक्तसंचार

By admin | Updated: September 8, 2014 00:56 IST

वडाळी वनपरिक्षेत्र कार्यालयालगतच्या नर्सरीत मादी बिबट्याचा पिलासह मुक्तसंचार आढळल्याने पुन्हा वनविभागात खळबळ उडाली आहे.

अमरावती : वडाळी वनपरिक्षेत्र कार्यालयालगतच्या नर्सरीत मादी बिबट्याचा पिलासह मुक्तसंचार आढळल्याने पुन्हा वनविभागात खळबळ उडाली आहे. त्यामुळे वनविभाग कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्यासोबतच नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे. वडाळी वनपरिक्षेत्र कार्यालयाजवळील पिंजऱ्यामध्ये चंद्रपूर येथील दोन नरभक्षक बिबट बंदिस्त आहेत. या बिबट्याच्या गंधामुळे जंगलातील मादी बिबट काही वर्षांपासून आकर्षित होत आहे. त्यामुळे अनेकदा वडाळीतील नर्सरीमध्ये बिबट मुक्तसंचार करताना वनविभागातील कर्मचाऱ्यांना आढळून आला आहे. याबाबत सर्वप्रथम ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. यावृत्ताची दखल घेत वनविभागाने उपाययोजना करण्याकरिता वडाळी वनपरिक्षेत्रांतर्गत परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला होता. त्यावेळी वनविभागाने त्या मादी बिबट्याचा मागोवा घेतला होता. त्याकरिता पिंजऱ्याजवळच टॅ्रप कॅमेरा लावून मादी बिबट कॅमेऱ्यात टिपले होते. रात्रीच्या सुमारास जंगलातील मादी बिबट पिंजऱ्याभोवती घिरट्या घालत पिंजऱ्याच्या आतील बिबट्याच्या मिलनासाठी प्रयत्न करीत होती. ही बाब वनकर्मचाऱ्यांच्या दृष्टीस पडली. त्याकरिता आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना जंगलात प्रवेशबंदी करण्यात आली होती. तसेच बिबट्यापासून सावधान, असे फलक वनविभागाकडून लावण्यात आले होते. मात्र काही दिवसांनंतर त्या मादी बिबट्याने वडाळी परिसर सोडला होता. त्यानंतर काही महिने पुन्हा ती मादी बिबट दिसली नव्हती. मात्र अधून-मधून वन कर्मचाऱ्यांना बिबट दृष्टीस पडतच होते. आता मात्र पुन्हा बिबट्यासोबत तिचे पिल्लु वडाळीच्या नर्सरीमध्ये फिरताना आढळले. त्यामुळे वडाळी वनपरिक्षेत्र कार्यालयाजवळील परिसरात वनविभागाने पुन्हा गस्त वाढविली आहे. (प्रतिनिधी)