शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते, संकुल अतिक्रमणातून घेणार मोकळा श्वास

By admin | Updated: February 13, 2016 00:06 IST

शहरातील विस्कटलेली वाहतूक व्यवस्था, रस्त्यालगतचे अतिक्रमण व संकुलातील गायब वाहनतळे शोधून काढण्यासाठी कृती आराखडा तयार केला जाणार आहे.

विभागीय आयुक्तांचे निर्देश : सुनील देशमुख यांचा पुढाकारअमरावती : शहरातील विस्कटलेली वाहतूक व्यवस्था, रस्त्यालगतचे अतिक्रमण व संकुलातील गायब वाहनतळे शोधून काढण्यासाठी कृती आराखडा तयार केला जाणार आहे. त्यानुसार महापालिका, पोलीस प्रशासनाने कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्यात. आ.सुनील देशमुख यांच्या पुढाकाराने वाहतूक, अतिक्रमण समस्येबाबतची बैठक शुक्रवारी पार पडली.येथील विभागीय आयुक्त कार्यालयात शहरातील अतिक्रमित रस्ते, संकुलातील गायब झालेली वाहनतळे यासह सामान्य नागरिकांच्या प्रश्नांविषयी विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी आ.सुनील देशमुख, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीपाद वाडेकर, पोलीस उपायुक्त पवार, माजी महापौर मिलिंद चिमोटे आदी उपस्थित होते. यावेळी आ. सुनील देशमुख यांनी शहरातील विस्कटलेल्या वाहतूक व्यवस्थेबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली. शहराच्या प्रमुख मार्गावर रस्त्यालगत अतिक्रमित हटविण्याची जबाबदारी कुणाची, असा प्रश्न त्यांनी उपस्थित करून अधिकाऱ्यांना नि:शब्द केले. बिघडलेली वाहतूक व्यवस्था सुधारण्याबाबत तातडीने उपाययोजना करण्याबाबत आ. देशमुखांनी प्रस्ताव ठेवताच विभागीय आयुक्तांनी लगेच महापालिका व पोलीस आयुक्तांना ‘एक्शन प्लॅन’ तयार करण्याच्या सूचना केल्यात. आ. देशमुख यांनी ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या आॅटोरिक्षांच्या समस्येवर हात घातला. तेंव्हा प्रादेशिक परिवहन अधिकारी वाडेकर यांनी आॅटोरिक्षांची समस्या दूर करण्यासाठी चमू गठीत करण्याचे आश्वासीत केले. ट्रक टर्मिनल, संकुलातील वाहन तळ, रस्त्यालगतचे दुकाने अशा सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या, प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी प्रशासनाची बाजू देखील ऐकून घेतली. दरम्यान पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक यांच्याकडून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी त्यांनी उपाययोजना जाणून घेतल्यात. आ. सुनील देशमुख आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या चर्चेअंती विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी शहरातील रस्ते व संकुलातील अतिक्रमण मुक्त करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)शहरातील संकुलातून गायब झालेले एकही पार्किंगस्थळ मोकळे करण्यासाठी प्रशासनाने कारवाई केली नाही. रस्त्यावर दुकाने थाटणे ही नित्याचीच बाब आहे. अतिक्रमणाबाबत लोकांच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे प्रशासनाला त्यांच्या कर्तव्याची जाणीव करुन देण्यासाठी ही बैठक घेण्यात आली होती.- सुनील देशमुख, आमदार, अमरावतीआ. सुनील देशमुख यांच्या पत्राच्या आधारे शहरातील विस्कळीत वाहतूक, अतिक्रमण समस्येविषयी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत समस्या सोडविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. नक्कीच ही समस्या, प्रश्न सुटून नागरिकांना दिलासा मिळेल.- ज्ञानेश्वर राजूरकर, विभागीय आयुक्त, अमरावतीहॉकर्स झोन निर्मितीचा घेतला आढावामहानगरात प्रस्तावित हॉकर्स झोन निर्मितीबाबत महापालिका प्रशासनाने आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीचा आढावा आ. सुनील देशमुख यांनी घेतला. शहरात हॉकर्सची संख्या, एकूण झोन, जागा निश्चित करण्याची प्रक्रिया अशा विविध प्रश्न उपस्थित करुन त्यांनी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्याकडून माहिती जाणून घेतली.