शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बनावटी बियाण्यांमुळे उत्पादकांची फसगत

By admin | Updated: November 5, 2015 00:28 IST

संत्रा उत्पाकांवर दरवर्षीप्रमाणे चिंतेचे सावट असल्याने नगदी पीक म्हणून मिरची उत्पादकांनी मिरचीचे उत्पादन घेणे सुरु केले.

राजुऱ्याचा मिरची बाजार ओस : आवक नसल्याने व्यापारी हवालदिल संजय खासबागे वरुडसंत्रा उत्पाकांवर दरवर्षीप्रमाणे चिंतेचे सावट असल्याने नगदी पीक म्हणून मिरची उत्पादकांनी मिरचीचे उत्पादन घेणे सुरु केले. तालुक्यात मिरची पिकाचे मोठ्या प्र्रमाणात उत्पादन घेतले जात असून यावषी मिरचीचे बनावटी बियाण्यामुळे आवक घटली तर मिरची उत्पादकांना फटका बसल्याने उत्पादनात घट झाली. एक हजार ते २ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. पंरतू आवक नसल्याने व्यापारी आणि मिरची उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहे. १०० ते १५० क्विंटल मिरची बाजारात येत असते. शेकडो हातांना काम देणारी बाजारपेठेत एरवी गदीर् दिसत होती परंतु आता शुकशुकाट दिसून येतो. मिरचीचे नकली बियाण्याची विक्री करणाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. वरुड तालुक्यात संत्र्याचे मोठया प्रमाणात उत्पादन घेतल्या जाते. परंंतु गत काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे संत्रा पिकात सुध्दा घट झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आता मिरचीकडे आगेकूच करीत मिरचीचे मोठया प्रमाणावर उत्पादन घेतल्या जाते. शेकडो क्विंटल मिरची राजूरा बाजारच मिरची बाजार येथे येते. कच्चा माल असल्याने परत नेणे शेतकऱ्यांना शक्य होत नाही. यामुळे ेमिळेल त्या भावात विकून मोकळ ेव्हावे लागते. रात्रीतून मिरची देवाणघेवाण करणारी राजूराबाजारची बाजारपेठ प्रसिध्द आहे. परंतु परप्रांतीय बाजारपेठेत सुध्दा चांगली मागणी असते. येथून कोलकाता, मुंबई, दिल्ली, जबलपूर, नागपूर, हैद्राबाद सह राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश छत्तिसगड, पंजाब, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, सह देशाच्या कानाकोपऱ्यात येथून मिरची पाठविल्या जाते. एवढेच नव्हे तर पाकीस्तान, बांग्लादेश , दुबई , सौदी अरब राष्ट्रासह आदी देशात येथील मिरचीला अधिक मागणी असल्याने निर्यात केल्या जाते. कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपबाजार असलेल्या राजुराबाजार मिरची बाजारात परवानाधारक १८९ व्यापारी, ५६ अडते, दोन मापारी, ९३ हमाल आणि एक वखारीवाला आहे. तर ५०० ते ६०० मजूरांच्या हाताला काम मिळते. तर बाजार सिमतीला सुध्दा सुरुवातीच्या काळात तीन ते चार हजार रुपये सेस मिळतो हंगामामध्य ेहा सेस २० ते २५ हजार रुपयापर्यंत उत्पन्न मिळवून देत असल्याचे सांगण्यात येते. वाहतूकदारांना सुध्दा चांगली संधी मिळते. परंतु यंदा मिरची उत्पादकांची फसगत झाल्याने राजुऱ्याचा मिरचीबाजार ओस पडला आहे.