शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

पीएसआयची चौथ्यांदा बदली

By admin | Updated: June 12, 2017 00:21 IST

शहर कोतवालीतील पोलीस उपनिरीक्षक आर.एस. लेवटकर यांची नुकतीच भातकुली ठाण्यात बदली करण्यात आली.

वरिष्ठांकडे दाद : भंडारी प्रकरणाचा तपास काढलालोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहर कोतवालीतील पोलीस उपनिरीक्षक आर.एस. लेवटकर यांची नुकतीच भातकुली ठाण्यात बदली करण्यात आली. गेल्या दहा महिन्यांत झालेली त्यांची ही चौथी बदली आहे. नवीनचंद्र भंडारीच्या महापालिकेतील बनवेगिरी प्रकरणाचा तपासही त्यांच्याकडून काढण्यात आला. आपल्या या बदलीसत्रामागे पाणी मुरत असल्याची शंका लेवटकर यांनी उपस्थित केली आहे. लेवटकर यासंदर्भात वरिष्ठ स्तरावर दाद मागणार आहेत. मॅटसह मुख्यमंत्री आणि राज्याच्या पोलीस महासंचालकापर्यंत तक्रार करून पोलीस विभागातील अशा घडामोडींची चौकशी करण्याची मागणी ते करणार आहेत. लेवटकर यांची प्रथम वलगाव पोलीस ठाण्यात पदोन्नतीने बदली करण्यात आली. तेथून त्यांची बदली पोलीस नियंत्रण कक्षात करण्यात आली. तेथून त्यांना कोतवाली ठाण्यात पाठविण्यात आले व आता तर कोतवालीतून थेट भातकुली पोलीस ठाण्यात नियुक्ती देण्यात आली आहे. लेवटकर यांच्याकडे महापालिकेतील भंडारी यांच्या बनवेगिरीच्या प्रकरणाचा तपास सुरू होता. त्यांच्या तपासकार्यामुळे महापालिकेतील अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव निर्माण झाला होता. त्या अनुषंगाने लेवटकर यांच्या हातातील तपासकार्य काढून टाकण्यात आल्यामुळे आता हे प्रकरण थंडबस्त्यात पडून आहे. आपल्या बदलीमागे राजकारण असल्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे. कोतवालीतून बदली होण्यापूर्वी लेवटकर यांना प्रशिक्षणासाठी पुणे येथे पाठविण्यात आले होते. दरम्यान ही बदली झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. बदली अधिनियम २००५ नुसार तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर बदली करण्यात येते. तथापि तीन वर्षांचा नियम डावलून आपली वर्षभरात चौथ्यांदा बदली का करण्यात आली, असा प्रश्न लेवटकर यांना पडला आहे. गुन्हे शाखेत फेरबदलाचा गुंता कायमगुन्हे शाखेतून बदली झालेले काही पोलीस अधिकारी व कर्मचारी पुन्हा पूर्व पदावर आले आहेत. या फेरबदलाविषयी पोलीस वर्तुळात घमासान चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे अन्य ठाण्यांतील काही पोलीस बदल्यासंदर्भात नाराजी व्यक्त करीत आहे.