शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

चौथा आरोपी अटकेत, पायलट वाहन जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 23:08 IST

गांजा वाहतूक करणाऱ्या ट्रकचा रस्ता निर्धोक करणाऱ्या चौथ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी अटक केली. पोलिसांनी याप्रकरणी चारचाकी वाहन जळगावतून जप्त करून अमरावतीत आणले आहे. प्रवीण ऊर्फ दत्तु आप्पासाहेब पाटील (३२, रा. अडगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

ठळक मुद्देगांजा तस्करी : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गांजा वाहतूक करणाऱ्या ट्रकचा रस्ता निर्धोक करणाऱ्या चौथ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी अटक केली. पोलिसांनी याप्रकरणी चारचाकी वाहन जळगावतून जप्त करून अमरावतीत आणले आहे. प्रवीण ऊर्फ दत्तु आप्पासाहेब पाटील (३२, रा. अडगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.स्थानिक गुन्हे शाखा व लोणी पोलिसांनी २५ जून रोजी नाकेबंदीत एच.आर.४६/सी १६५७ या क्रमाकांच्या ट्रकमधून केळी खाली लपवून ठेवलेला १० क्विंटल गांजा जप्त केला. लोणी पोलिसांना गुन्हा नोंदविल्यानंतर सदर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. तपासादरम्यान जप्त केलेला ट्रक हा आंध्र प्रदेशातून जळगावला जात असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांची दोन पथके आंध्रप्रदेश व जळगावकरिता रवाना झाली. गांजाची खेप नेणाºया ट्रकला रस्त्याबाबत एक चारचाकी वाहन दिशानिर्देश देत असल्याची बाब पोलिसांसमोर आली होती. त्या वाहनाचा चालक प्रवीण पाटीलला पोलिसांनी जळगावातून अटक करून एमएच ४१ एएस ०८९६ क्रमांकाचे चारचाकी वाहन जप्त केले. प्रवीणला पोलिसांनी सोमवारी न्यायालयासमक्ष हजर करून त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली.पोलीस अधीक्षक दिलीप झळके, अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील किनंगे, पोलीस उपनिरीक्षक भारत लसंते, एएसआय मूलचंद भांबूरकर, पोलीस हवालदार युवराज मानमोठे, संदीप लेकुरवाळे, चेतन दुबे व चालक नितेश तेलगोटे यांनी ही कारवाई केली.एक पथक आंध्रात, एक जळगावातगांजा तस्करीतील अन्य आरोपींच्या शोधात पोलिसांचे एक पथक जळगावला, तर दुसरे पथक आंध्रप्रदेशात गेले आहे. गांजा तस्करीतील मुख्य आरोपी अनिकेत ऊर्फ विक्की प्रमोद पवार व विकास पाटील असल्याची बाब पुढे आली आहे. याशिवाय ‘डॉक्टर’ टोपणनाव असलेला सागर सूर्यवंशी व गोपाल नामक आरोपींना जळगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांचा ताबा मिळविण्यासाठी अमरावती ग्रामीण पोलीस जळगावाकरिता रवाना झाले आहेत.९ हजार ५०० रुपयात भाड्याचे वाहनगांजाचा माल आंध्र प्रदेशातून विदर्भ मार्गे जळगावात पोहोचणार होता. यापूर्वीही अशाप्रकारे गांजाची तस्करी झाल्याची माहिती पुढे येत आहे. गांजातस्करांनी जळगावातील अडगाव येथून चारचाकी वाहन ९ हजार ५०० रुपयांनी भाडेतत्त्वावर घेतले होते.