शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटात चार वर्षीय बालकाचा अंधश्रद्धेतून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 23:07 IST

मेळघाटात चार वर्षीय बालकाचा अंधश्रद्धेतून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी उघडकीस आली. हर्षल दयाराम बेलसरे (वय ४ वर्ष रा.गौलखेडाबाजार) असे मृताचे नाव आहे. तो पंधरा दिवसांपासून आजारी असताना त्याच्यावर वैद्यकीय उपचार न करता त्याला भुमकाजवळ नेण्यात आले होते.

ठळक मुद्देभुमकाकडे गेले उपचारासाठीआरोग्य यंत्रणा हतबल

लोकमत न्यूज नेटवर्कचुरणी (अमरावती ) : मेळघाटात चार वर्षीय बालकाचा अंधश्रद्धेतून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी उघडकीस आली. हर्षल दयाराम बेलसरे (वय ४ वर्ष रा.गौलखेडाबाजार) असे मृताचे नाव आहे. तो पंधरा दिवसांपासून आजारी असताना त्याच्यावर वैद्यकीय उपचार न करता त्याला भुमकाजवळ नेण्यात आले होते.हर्षलच्या अंगावर एक फोड आला होता, मात्र, कुटुंबियांनी त्याला डॉक्टरांकडे न नेता घरीच मंत्रोपचार व गावठी औषधोपचार केला. शुक्रवारी रात्री हर्षलचा मृत्यू झाल्यानंतर गावात चर्चेला उधाण आले. या घटनेवरून मेळघाटातील आदिवासी आजही अंधश्रध्देला खतपाणी घालत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे मंत्रोपचार करणाऱ्या ‘भगत भुमका’वर कठोर कारवाई करावी, असा सूर मेळघाटात उमटू लागला आहे. जनजागृतीचा अभाव, तालुका व जिल्हास्तरावरील आरोग्य यंत्रणेकडून योग्य तो प्रतिसाद न मिळणे, आरोग्य विभागाचे कर्मचारी व भरारी पथकांचे मुख्यालयी न राहणे हे सुध्दा यामागील कारणे असण्याची शक्यता आहे. अनेकदा आरोग्य कर्मचारी रुग्णांना उपजिल्हा किंवा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जातात. मात्र, रुग्णांची मानसिकता पाहता, ते उपचार घेण्याची तयारी दाखवित नाही. याशिवाय त्यांना त्रास होत असल्याचीही ओरड होते. त्यामुळे मेळघाटात अंधश्रध्दा वाढण्यास मदत मिळत असल्याचे दिसून येत आहे.आजारी बालकाच्या घरी उपचारासाठी गेलो असता संबंधित पालकांनी उपचार करवून घेण्यासाठी नकार दिला. आम्हाला घरात सुध्दा येऊ दिले नाही. परिणामी प्रकृती गंभीर झाली आणि तो दगावला.- सचिन राठोड,वैद्यकीय अधिकारी, गौलखेडाबाजार आरोग्य केंद्र.मेळघाटातील आदिवासीचा अशाप्रकारे मृत्यू होण्याची बाब आम्ही खपवून घेणार नाही. आरोग्य विभागाने उचित मार्गदर्शन केले असते, तर त्या बालकाचा जीव वाचवला जाऊ शकला असता.- मंगलसिंग धुर्वे,शिवसेना तालुकाप्रमुख, चिखलदरा.