शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

आहारपुरवठा निविदेतून चार टक्के राखीव अधिकार हिरावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 18:30 IST

महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाड्यांमार्फत आहार पुरवठ्यासाठी काढलेल्या दोन हजार ८७८ कोटींच्या निविदा प्रक्रियेत अनुसूचित जाती संवर्गासाठी असलेला चार टक्के राखीव अधिकार हिरावल्याची बाब समोर आली

अमरावती, दि. 20 - महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाड्यांमार्फत आहार पुरवठ्यासाठी काढलेल्या दोन हजार ८७८ कोटींच्या निविदा प्रक्रियेत अनुसूचित जाती संवर्गासाठी असलेला चार टक्के राखीव अधिकार हिरावल्याची बाब समोर आली आहे. या निविदेविरोधात मागासवर्गीय महिला बचतगट उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत.राज्य शासनाने सन 2011मध्ये निर्णय घेऊन निविदा प्रक्रिया राबविताना मागासवर्गीय पुरुष, महिलांना वाटा मिळावा, यासाठी चार टक्के राखीव अधिकार बहाल केले आहे. मात्र, महिला व बालकल्याण विभागाने आहार पुरवठा निविदा काढताना अनुसूचित जाती संवर्गासाठी कोणतेही राखीव अधिकार बहाल केले नाहीत. त्यामुळे ही निविदा शासन निर्णयाचे उल्लंघन करणारी आहे. एकाच बड्या एजन्सीला अंगणवाडी आहार पुरवठा करण्याचा कंत्राट देऊन शासन वेगळी खेळी करीत असल्याचा आरोप सर्वसामान्य महिला बचतगटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.जिल्हानिहाय आहारपुरवठा निविदा काढताना यात केवळ मोठी एजन्सीच कायम राहिल अशा अटी-शर्ती निविदेत लादल्या गेल्या आहेत. त्यामुळेच आपसुकच लहान-सहान महिला बचतगट या निविदेतून बाद होतील, हे वास्तव आहे. राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाडीमार्फत तीन ते सहा वर्षे वयोगटाच्या ३७ लाख ६३ हजार २२० अंगणवाड्यातील बालकांना दालखिचडी, राईस पुलाव, मीठा चावल, स्वीट सेवई आदी सात प्रकारचा आहार पुरवठा करण्यासाठी निविदा काढल्या आहेत. मात्र, यानिविदेत अनुसूचित जाती संवर्गाला चार टक्के राखीव अधिकार देण्यात आले नाहीत. त्यामुळे ही ई-निविदा देखील नियमबाह्य असल्याचा आक्षेप मागासवर्गिय महिलांनी घेतला आहे.कोट‘‘राज्यात सर्वच प्रकारच्या निविदा प्रक्रियेत अनुसूचित जाती संवर्गासाठी चार टक्के राखीव अधिकार बहाल करण्यात आले आहेत. मात्र, महिला व बालकल्याण विभागाने काढलेल्या अंगणवाडी आहारपुरवठा निविदेत ‘एससी’ संवर्गाचे अधिकार गुंडाळून ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. याविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली जाईल.ज्योत्सना सहारे,सचिव, विकास मागासवर्गिय महिला मंडळ, यवतमाळ