शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

क्रि के ट सट्टा खेळताना चौघांना अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 23:33 IST

दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणाºया तिघांसह एका बुकीला दत्तापूर पोलिसांनी अटक केली.

ठळक मुद्देएक लाखाचा मुद्देमाल जप्त : आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी

आॅनलाईन लोकमतधामणगाव रेल्वे : दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणाºया तिघांसह एका बुकीला दत्तापूर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याजवळून टीव्ही, मोबाइल, मोटार सायकल व रोख दहा हजार रुपये असा एक लाखाहून अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मागील अनेक दिवसांपासून शहरात सट्टा चालत असल्याची चर्चा होती. प्राप्त माहितीनुसार, शहरातील मार्केट चौकातील शुभम दीपक जयस्वाल (२३) याच्या घरी क्रिकेटचा सट्टा सुरू असल्याची माहिती दत्तापूर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी पंचांसह शुभमच्या घरी धाड घातली. यात दहा हजार रुपये रोख मिळाले. येथून शुभम दीपक जयस्वाल (२३ रा. मार्केट चौक) अखिलेश अशोक गावंडे (२८ रा. दत्तापूर) प्रणय प्रमोद कांकरिया (२२ रा. नूतन चौक) व अंकुश सुरेशकुमार बुधलानी (२२) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले व चौकशीअंती मुंबई जुगार कायद्याचे कलम ४ व ५ सह भादंविच्या सहकलम ४२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींकडून मोबाइल, टीव्ही, मोटर सायकल असा एक लाखांच्या वर माल जप्त करण्यात आला आहे. कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सदानंद मानकर यांचा सहभाग होता. पोलीस निरीक्षक अशोक लांडे, पोलीस उपनिरीक्षक सचिन कानडे, पोलीस उपनिरीक्षक  अरविंद कुमरे, पोलीस कर्मचारी संजय प्रधान, मंगेश लकडे, विजयसिंह बघेल, किरण दारव्हेकर, गणेश गायकवाड, सचिन गायधने, सचिन अढाऊ , कांचन दाहाट यांनी शिताफीने सापळा रचून सट्टेबाजांना ताब्यात घेतले. तालुका न्यायदंडाधिकारी जुही हुशांगाबादे यांनी चौघांना एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आह. या प्रकरणाचा अधिक तपास दत्तापूर दुय्यम पोलीस निरीक्षक सचिन कानडे करीत आहेत. बडे मासे गळाला लागणार तपासात तरुण मुलांचीसुद्धा नावे समोर येणार असल्याची माहिती आहे. सध्या याप्रकरणी चौघांना ताब्यात घेतले असले तरी मोठे मासेसुद्धा गळाला लागणार असल्याचे दिसून येत आहे. शैक्षणिक गुणवत्तेत अग्रेसर असलेल्या शहरालासुद्धा क्रिकेटच्या सट्टाबाजाराचे स्वरूप आले असल्याचे घडलेल्या घटनेने स्पष्ट झाले आहे.