शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

कोंबून नेताना चार बैलांचा मृत्यू

By admin | Updated: June 16, 2016 00:29 IST

जनावरांची कत्तलखान्याकडे वाहनात डांबून निर्दयतेने वाहतूक करताना एक ट्रक बेनोडा पोलिसांनी पकडला.

४३ गाई जखमी : बेनोडा पोलिसांची संयुक्त कारवाई वरूड : जनावरांची कत्तलखान्याकडे वाहनात डांबून निर्दयतेने वाहतूक करताना एक ट्रक बेनोडा पोलिसांनी पकडला. यामध्ये चार बैलाचा गुदमरुन मृत्यू झाला तर ४३ गोवंश जनावरे गंभीरावस्थेत होती. पोलिसांनी यासंदर्भात ट्रक जप्त करुन आरोपींना अटक केली. तालुक्यातून गोवंशाच्या जनावरांची अवैध वाहतूक सुरुच असल्याची खमंग चर्चा परिसरात आहे. ४३ जनावरांची कृष्णगोपाल गोरक्षणमध्ये रवानगी करण्यात आली.शासनाने गोवंश हत्या बंदी केली असली तरी तालुक्यातून गोवशांची मोठया प्र्रमाणावर तस्करी केल्या जात असल्याची चर्चा सुरु असते. कुणाच्या आशिर्वादाने गोवंशाची तस्करी सुरु आहे, अशी चर्चासुध्दा जनमानसात आहे. काल दुपारी दोन वाजताचे दरम्यान बेनोडा पोलिसांना गोवंशाची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरुन ठाणेदार शांतीकुमार पाटील यांनी पोलीसासह सापळा रचून ट्रक एम.पी.०९ के.डी. १०८५ मध्ये ताडपत्री झाकून ४७ गोवशांचे जनावरांची वाहतूक करत असताना थांबविला. यामध्ये तपासणी केली असता चार बैलाचा गुदमरुन मृत्यू झाला होता तर ४३ गोवंश जनावरे गंभीरावस्थेत होती. पोलिसांनी वरुडच्या कृष्णगोपाल गोरक्षण संस्थेमध्ये आणून ४३ जनावरे संगोपनासाठी ठेवली. या प्रकरणात बेनोडा पोलिसांनी ट्रक जप्त करुन आरोपी मो. वसीम खान रा. देवास (म.प्र), अफसर मोहम्मद हनी रा. जून्नारदेव (म.प्र) यांच्या विरुध्द भादंविचे कलम ४२९, (११) प्राणी संरक्षण कायदा, (९) प्राणी संग्रहालय कायद्यांतर्गत कारवाई करुन अटक करण्यात आली. यामुळे मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात गोवंशाची तस्करी होत असल्याची बाब पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)