शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

चार लाख क्विंटल तूर घरात पडून

By admin | Updated: May 2, 2017 00:37 IST

शेतकऱ्याजवळील अखेरचा दाणा खरेदी करण्याचे आश्वासन देणाऱ्या शासनाने अर्ध्यावर डाव मोडला. सरकारी तूर खरेदी केंद्र बंद केलेत.

दैना : शासनाच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचे मरण होत असल्याचा आरोपअमरावती : शेतकऱ्याजवळील अखेरचा दाणा खरेदी करण्याचे आश्वासन देणाऱ्या शासनाने अर्ध्यावर डाव मोडला. सरकारी तूर खरेदी केंद्र बंद केलेत. मोजणीच्या प्रतीक्षेत महिन्याभरापासून यार्डात पडून असलेल्या अडीच लाख पोते तुरीची दैनावस्था झाली आहे. शेतकऱ्यांच्या घरी चार लाख क्विंटलवर तूर पडून असल्याने जगावे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना अस्वस्थ करीत आहे.गतवर्षीच्या खरिपात तुरीसाठी एक लाख १४ हजार ९९५ हेक्टर सरासरी क्षेत्र असताना प्रत्यक्षात एक लाख ३४ हजार ४३९ हेक्टरमध्ये तुरीची पेरणी झाली व समाधानकारक पाऊस असल्याने तुरीची सरासरी ११.५६ क्विंटल इतकीच उत्पादकता राहिली. म्हणजेच जिल्ह्यात १५.५० लाख क्विंटल तुरीचे उत्पादन झाले. तुरीच्या हंगामापूर्वीच भाव कोसळले. तीन हजार रूपये क्विंटल याप्रमाणे व्यापाऱ्यांनी तुरीची खरेदी केली. २६ ते २८ डिसेंबर या कालावधीत नाफेडचे १० तूरखरेदी केंद्र सुरू करण्यात आले. प्रत्यक्षात व्यापाऱ्यांनी खुल्या बाजारात शेतकऱ्यांजवळून कवडीमोल दराने खरेदी केलेल्या तुरीची केंद्रावर ५०५० रूपये हमीभावाने शेतकऱ्यांच्या नावाआडून विक्री केली. विशेष म्हणजे बाजार समिती व खरेदी यंत्रणांच्या सहकार्याने शासनाला करोडो रूपयांचा चूना लावण्यात आला. शासनाला अखेर जाग आली. मात्र, तोवर व्यापारी तुरीची विक्री करून मोकळे झाले.या पार्श्वभूमिवर शासनाने २२ एप्रिलपासून सर्व तूर खरेदी केंद्र बंद केलेत. या दिनांकापर्यंत केंद्रावर नोंद झालेल्या तुरीची खरेदी करण्यात येणार आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या घरी चार लाख क्विंटलपेक्षा अधिक तूर पडून आहे. यंदाचा खरीप महिन्यावर आला आहे. तूर खरेदी केंद्र बंद व खुल्या बाजारात कवडीमोल भाव यामुळे शासनाचे धोरण हेच शेतकऱ्याचे मरण ठरत असल्याचा आरोप सर्वत्र होत आहे. (प्रतिनिधी)बाजार समितीत ११.२० लाख क्विंटल आवकधारणीसह जिल्ह्यातील १० बाजार समित्यांमध्ये केंद्र बंद होण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत ११.२० लाख क्विंटल तुरीची आवक झाली. जिल्ह्याची तूर उत्पादकता १५.४१ लाख क्विंटल असल्याने किमान ४.३४ लाख क्विंटल तूर अजूनही शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे. केंद्र बंद झालीत. खुल्या बाजारात कवडीमोल भाव यामुळे शेतकऱ्यांसमोर जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. घरातली तूर देखील कवडीमोल भावाने जाणारयंदाचा खरीप महिन्यावर आला आहे. शेतकरी बँकांचे थकबाकीदार असल्याने पुन्हा कर्ज मिळण्यात अडचणी आहेत. मुलांचे शिक्षण, लग्न व पेरणी कशी करावी याची विवंचना आहे. अशा स्थितीत भाववाढीच्या आशेने राखून ठेवलेली तूर देखील कवडीमोल भावाने विकली जाणार, अशी स्थिती आहे. बाजार समित्यांवर कारवाई कराबाजार समिती अधिनियम १९ अन्वये मार्केट यार्डात हमीपेक्षा कमी भावाने खरेदी होत असेल तर बाजार समितीने हस्तक्षेप करून व्यापाऱ्यांना हमीदराने माल घेण्यास बाध्य करावे. मात्र, असे होत नसल्याने शासनाने कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. दिवाळीतच येतो उत्पादनाचा अंदाज, शासनाचे नियोजन चुकलेवास्तविकत: यंदा तुरीचे उत्पादन किती होणार याचा अंदाज तूर फुलोरावर असताना दिवाळीतच येतो. शेतकऱ्यांना हा अंदाज येऊ शकतो तर शासनाला का येत नाही, हा प्रश्न आहे. मुळात तुरीच्या उत्पादनाचा आढावा घेण्यास व त्याचे नियोजन करण्यात सरकार कमी पडले. त्यामुळे शेतकऱ्यांची दैना झाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.