शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

चार लाख शेतकरी झाले सोसायटींचे सभासद

By admin | Updated: February 2, 2017 00:01 IST

सर्वच ७/१२ धारक शेतकऱ्यांना कर्जासह विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी स्थानिक सेवा सहकारी सोसायटींचे सभासद केले जात आहे.

विशेष अभियान : सर्वच शेतकऱ्यांना होणार कर्जाचा लाभगजानन मोहोड अमरावतीसर्वच ७/१२ धारक शेतकऱ्यांना कर्जासह विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी स्थानिक सेवा सहकारी सोसायटींचे सभासद केले जात आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाद्वारा राबविल्या जात असलेल्या ‘स्पेशल ड्राईव्ह’मध्ये तालुकास्तरावरील चमू प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संपर्क साधत आहे. सध्या चार लाख १५ हजार ८१८ शेतकऱ्यांपैकी चार लाख ८ हजार ९४१ शेतकऱ्यांना सभासद करण्यात आले आहे. प्रत्येक शेतकऱ्याला सोसायटीच्या माध्यमातून विविध सुविधांचा लाभ मिळावा व तो आर्थिक संपन्न व्हावा, यासाठी शासनाने सहकार विभागाच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला गावातील सेवा संस्थेचा सदस्य करण्यासाठी हे अभियान सुरू केले आहे. जिल्ह्यात ६२३ सेवा सहकारी सोसायटी आहेत. यासोसायटींचे सभासद होण्यास काही अटी आहेत. त्यामुळे अनेक ७/१२ धारक शेतकरी अद्यापही संस्थांचे सभासद झालेले नाहीत. यामुळे त्यांना सोसायटीच्या निवडणुकीत सहभागी होता येत नाही, डॉ. पंजाबराव देशमुख व्याजसवलत योजनेचा लाभ मिळत नाही. तसेच जिल्हा बँकेचे कर्जही मिळत नाही. इतर अनेक सुविधांपासून शेतकरी वंचित राहतात. यासाठी सहकार विभागाने ‘अ‍ॅक्शन प्लान’ तयार केला असून तालुकास्तरावर पथक तयार करून शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात येत आहे. गावस्तरावर सभा घेणे, भित्तीपत्रकाद्वारे व गावस्तरावर दवंडी देऊन जनजागृती करण्याच्या सूचना यापूर्वीच जिल्हा उपनिबंधकांनी दिल्या आहेत. शासनाच्या सहकारविषयक धोरणामुळे सहकारक्षेत्रात ठाण मांडून बसलेल्या प्रस्थापितांना फटका बसेल.११ हजार शेतकरी सभासद होणे बाकीजिल्ह्यात एकूण ४ लाख १५ हजार ८५८ शेतकरी सभासद आहेत. यापैकी ४ लाख ८ हजार ९४१ शेतकरी सभासद होण्यास पात्र आहेत. यापैकी ३ लाख ९७ हजार ८१३ शेतकरी हे सोसायटींचे सभासद झालेले आहेत. अद्याप ११ हजार ४८ शेतकरी हे सोसायटींचे सभासद होणे बाकी आहे. शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. -तर शेतकरी करू शकतात अपीलएखाद्या सेवा सहकारी सोसायटीने शेतकऱ्याला सभासदपद देण्याचे नाकारल्यास महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६०चे कलम २३ नुसार सहायक निबंधक, सहकारी संस्था यांच्याकडे सभासदपद मिळणेबाबत अपील करता येते. १० आर.क्षेत्रधारणा हवीसोसायटीचे सभासद होण्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करावा लागतो. अर्जदार व्यक्ती ही १८वर्षांपेक्षा अधिक वयाची हवी, ती संस्थेच्या कार्यक्षेत्रातील रहिवासी हवी व त्या व्यक्तिकडे किमान १० आर. क्षेत्रधारणा हवी. याविषयीचा सातबारा त्याने अर्जासोबत जोडावा तसेच पोटनियमाप्रमाणे १०० रुपये शुल्क व १०० रुपयांचा एक भाग संस्थेकडे जमा करणे आवश्यक आहे६ हजार ९१७ शेतकरी अपात्रसहकारी सोसायटींचे सभासद होण्यास ६ हजार ९१७ शेतकरी अपात्र आहेत. यापैकी १२५० शेतकरी मृत आहेत तर १२४५ शेतकरी अज्ञान आहेत. १३७७ शेतकरी गाव सोडून निघून गेले आहेत व २०४५ शेतकरी शेती विकून भूमीहिन झाले आहेत.जिल्ह्यात ११ हजार शेतकरी सभासद होणे बाकी आहे. त्यांनी सभासद व्हावे, यासाठी प्रत्येक गावात स्थानिक पथकाद्वारे जनजागृती सुरू आहे. - गौतम वालदे, जिल्हा उपनिबंधक