शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चार प्रतिष्ठान खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 22:11 IST

रायली प्लॉट येथील सतिधाम मंदिरालगतच्या गोवर्धननाथ हवेली स्थित संकुलातील चार व्यापारी प्रतिष्ठाने शुक्रवारी सकाळी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या भीषण आगीत लाखोंचे साहित्य जळून खाक झाले.

ठळक मुद्देसतिधाम मंदिरालगतची घटना : बघ्यांच्या गर्दीमुळे नियंत्रण मिळविण्यास विलंब

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रायली प्लॉट येथील सतिधाम मंदिरालगतच्या गोवर्धननाथ हवेली स्थित संकुलातील चार व्यापारी प्रतिष्ठाने शुक्रवारी सकाळी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या भीषण आगीत लाखोंचे साहित्य जळून खाक झाले. अग्निशमन विभागाने वेळेवर घटनास्थळ गाठले. मात्र, बघ्यांच्या गर्दीमुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागले.गोवर्धननाथ हवेली नावाने प्रचलित असणाऱ्या जागेवर व्यापारी संकुल आहे. या संकुलातील राजू मिश्रा यांचे कामाक्षी लाइट्स व सोना कलेक्शन नावाचे व्यापारी प्रतिष्ठान आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजता मिश्रा यांच्या पत्नी भावना यांनी प्रतिष्ठान उघडताच आगीचे लोळ बाहेर पडले. या घटनेच्या माहितीवरून अग्निशमनने पाण्याचा बंब घेऊन आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. काही वेळात अग्निशमन अधीक्षक भरतसिंह चव्हाण व ट्रान्सपोर्ट उपकेंद्रप्रमुख सैय्यद अनवर यांनी पाण्याचे बंब घेऊन रायली प्लॉट परिसर गाठला. मात्र, बघ्यांच्या प्रचंड गर्दीमुळे पाण्याचे बंब आगीच्या ठिकाणी पोहोचण्यास विलंब झाला. यादरम्यान प्रतिष्ठानातील बहुतांश मुद्देमाल जळून खाक झाला होता. पाण्याच्या ११ बंबांचा वापर केल्यानंतर आग आटोक्यात आली.घटनेच्या माहितीवरून कोतवालीचे पोलीस निरीक्षक दिलीप पाटील, पीएसआय नरेश मुंढे यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांना पांगवले.फायरमन जखमीघराच्या सजावटीसाठी उपयोगी पडणाऱ्या साहित्याचे प्रतिष्ठान, गोडावून, रेडीमेड कपडे व ज्वेलरी शॉप अशी चार प्रतिष्ठाने आगीच्या भक्षस्थानी सापडली होती. भीषण आगीमुळे प्रतिष्ठानातील काचा फुटल्या. आग विझविताना यातील काचा लागून फायरमन प्रेमानंद सोनकांबळे यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली.सुनील देशमुख यांची भेटभीषण आगीच्या घटनेच्या माहितीवरून आ. सुनील देशमुख यांनीही घटनास्थळी धाव घेतली. शहराच्या मध्यवस्तीतील व वर्दळीच्या ठिकाणी ही आग लागली होती. त्यातच सतिधाम मंदिरलगतच हे व्यापारी प्रतिष्ठाने आहेत. त्यामुळे घटनेचे गांभीर्य पाहता, आ. सुनील देशमुख यांनीही घटनास्थळी भेट दिली.