शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

सपन प्रकल्पाचे चारही दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 23:08 IST

सपन प्रकल्पाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरण ९४ टक्के भरले असून, सपन प्रकल्पस्थळी व प्रकल्पाच्या कॅचमेन्टमध्ये पाऊस सुरूच असल्यामुळे जलसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. शुक्रवारला रात्री ११ वाजताच्या दरम्यान धरणाचे दोन गेट उघडले होते.

ठळक मुद्देधरणात ९४ टक्के साठा : शहानूर ६८, चंद्रभागा ७६, पूर्णा प्रकल्पात ५२ टक्के जलसाठा

अनिल कडू।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : सपन प्रकल्पाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरण ९४ टक्के भरले असून, सपन प्रकल्पस्थळी व प्रकल्पाच्या कॅचमेन्टमध्ये पाऊस सुरूच असल्यामुळे जलसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे.शुक्रवारला रात्री ११ वाजताच्या दरम्यान धरणाचे दोन गेट उघडले होते. शनिवारी पाण्याचा येवा वाढल्याने पूर्ण दुपारी २ वाजता चारही गेट १० सेंमीमिटरने उघडल्या गेलेत. शनिवारी सकाळी ७ वाजता धरण ९३.७७ टक्के भरल्यावरून हेच दरवाजे १० सेंटीमिटरने उघडल्या गेलेत. सकाळी सव्वानऊच्या दरम्यान धरण ९४.२८ टक्के भरल्यावरून हेच दरवाजे १५ सेंटीमिटरने उघडल्या गेलेत. धरणाऱ्या जलसाठ्यात वाढ होत गेल्यास दरवाजे आणखी उघडावे लागणार असल्याचे अधिकाºयांनी स्पष्ट केले. सपन प्रकल्पस्थळी व परिसरात शुक्रवारी सायंकाळी ५ ते ९ दरम्यान ४० एमएम पाऊस पडला. सायंकाळी ९ ते सकाळी ६ पर्यंत १२० एमएम पाऊस पडला. प्रकल्पस्थळी २४ तासांत ६५ एमएम तर कॅचमेन्ट क्षेत्रात १६० एमएम पावसाची नोंद आहे.परिसरात सतत पाऊस पडत असतानाही शुक्रवारला सायंकाळी ८.३० पर्यंत कुणीही अधिकारी प्रकल्पस्थळी उपस्थित नव्हते. केवळ दोन चौकीदार परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते. सायंकाळी ८.३० च्या दरम्यान आवनकर नामक कनिष्ठ अभियंता प्रकल्पस्थळी पोहचलेत. तर यानंतर १० वाजताच्या दरम्यान उपविभागीय अभियंता इंदूरकर आणि हांडे दाखल झालेत. प्राप्त माहितीनुसार हे सर्व संबंधित अधिकारी अमरावतीला त्यावेळेस उपस्थित होते.गणपती विसर्जनाकरिता धरणातील पाणी सोडण्यात यावे याकरिता अचलपूर एसडीओ व्यंकट राठोड यांनी कार्यकारी अभियंता क्षीरसागर यांच्याशी दूरध्वनीवरून शुक्रवारलाच संपर्क साधला होता. दरम्यान सायंकाळी पावसाचे प्रमाण वाढले आणि सपन प्रकल्प ९४ टक्के भरले. यात प्रकल्प अधिकाºयांनी दरवाजे उघडलेत आणि गणेश विसर्जनाकरिता पाणी उपलब्ध झाले. गणपती पावलेत, एसडीओ व्यंकट राठोड यांची इच्छा आपोआप पूर्णत्वास गेली.अचलपूर तहसील अंतर्गत येत असलेल्या सपन प्रकल्पासह शहानूर धरण ६८ टक्के, तर चंद्रभागा धरण ७६ टक्के भरले आहे. चांदूरबाजार तालुक्यातील पूर्णा प्रकल्प केवळ ५२ टक्केच भरले आहे. शहानूर, चंद्रभागा, पूर्णा प्रकल्पाचे दरवाजे उघडण्याचा सध्या तरी प्रश्न नाही. धरण ९० टक्क्यांच्यावर भरतील तेव्हाच दरवाजे उघडण्याचा प्रश्न निर्माण होईल, असे संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.