शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

आकाशात पहायला मिळणार चार दिवस आतषबाजी; होणार मोठ्या प्रमाणात उल्कावर्षाव

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: November 8, 2024 18:15 IST

Amravati : १७ ते २० नोव्हेंबरदरम्यान सिंह तारकासमुहातून उल्कावर्षाव

गजानन मोहोडअमरावती : १७ ते २० नोव्हेंबरदरम्यान सिंह तारकासमुहातून मोठ्या प्रमाणात उल्कावर्षाव होणार आहे. पहाटेच्या सुमारास याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे आकाशात चार दिवस आतषबाजी पहायला मिळणार आहे.     

उल्कावर्षावाची तिव्रता, निश्चित तारीख, वेळ या गोष्टी खात्री सांगता येत नाही. घराबाहेर आणि भराभर उल्का पडतांना दिसल्या अशी अवास्तव कल्पना कोणी करु नये. उल्काचे निरीक्षण आणि त्याच्या नोंदीची खगोल जगतात खूप गरज आहे.

या उल्का वर्षावाला ‘लिओनिड्स’ हे नाव आहे. अंधाऱ्या रात्री आकाशाचे निरीक्षण करीत असतांना एकाद्यावेळी क्षणार्धात एकादी प्रकाशरेषा चमकून जाताना आपणास दिसते या घटनेस तारा तुटणे असे म्हणतात. ही एक खगोलीय घटना आहे एखाद्यावेळी उल्का आपल्याला पडताना दिसते, या संदर्भात लोकांच्या अंधश्रद्धा आहे. परंतू अशा अंधश्रद्धेला खगोलशास्त्रात कोठेही आधार नाही.

सिंह तारकासमुहातून होणारा हा उल्कावर्षाव ‘टेम्पलटटल’ या धूमकेतूच्या अवशेषामुळे होतो व हा धूमकेतू ३३ वर्षांनी सुर्याला भेट देतो. सर्व खगोलप्रेमिंनी उल्का वर्षावाचे विलोभनीय दृष्य पाहावे, असे आवाहन मराठी विज्ञान परिषदेचे अमरावती विभागीय अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौसी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी केले आहे.

काय आहे उल्कावर्षाव?धूमकेतू सूर्याला प्रदक्षिणा घालून जात असतांना त्यातील काही भाग मोकळा होतो, धुमकेतूने मागे टाकलेले ते अवशेष असतात. या उल्का एकाद्या तारका समुहातून येत आहेत, असे वाटते. तासाला ६० किंवा त्यापेक्षा जास्त उल्का आकाशातील एकाद्या भागातून पडत असतील तर त्यास उल्का वर्षाव म्हणतात. काही वेळा गतिमान उल्का पृथ्वीच्या वातावरणातून खाली येताना त्या घनरुप अवस्थेत पृथ्वीवर येतात, त्यास ‘अशणी’ म्हणतात, बाह्य अवकाशातील वस्तूचे नमूने या अशणीमुळे मिळतात.

टॅग्स :Amravatiअमरावती