शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

चार धरणांची दारे उघडली

By admin | Updated: August 3, 2016 23:59 IST

जिल्ह्यात सुरू असलेल्या सार्वत्रिक पावसासोबत धरणक्षेत्रात देखील जोरदार पाऊस बरसत असल्याने ...

सतर्कतेचा इशारा : जिल्ह्यात सार्वत्रिक, धरणक्षेत्रात जोरदार पाऊस अमरावती : जिल्ह्यात सुरू असलेल्या सार्वत्रिक पावसासोबत धरणक्षेत्रात देखील जोरदार पाऊस बरसत असल्याने जिल्ह्यातील पाच पैकी चार प्रकल्पांची दारे बुधवारी उघडण्यात आलीत. नदीनाल्यांना पूर येण्याची शक्यता असल्याने खोलगट भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. जिल्ह्यातील मुख्य उर्ध्व वर्धा प्रकल्पात ५६४ दलघमी संकल्पित साठ्याच्या तुलनेत सद्यस्थितीत ४८६.१८ दलघमी जलसाठा आहे. ही ८६.१९ टक्केवारी आहे. जिल्ह्यात ४ मध्यम प्रकल्प आहत. यापैकी शहानूर प्रकल्पांत संकल्पित ४६.०४ दलघमी साठ्याच्या तुलनेत ३४.१९ दलघमी साठा आहे. ही ७४.२६ टक्केवारी आहे. चंद्रभागा प्रकल्पात संकल्पिय ४१.२५ दलघमी साठ्याच्या तुलनेत २८.०८ दलघमी साठा आहे. ही ६८.०७ टक्केवारी आहे. पूर्णा प्रकल्पात संकल्पित ३५.३७ दलघमी साठ्याच्या तुलनेत २४.४५ दलघमी साठा शिल्लक आहे. ही ६९.१३ टक्केवारी आहे.सर्वच तालुक्यांची सरासरी पारअमरावती : सपन प्रकल्पात संकल्पित ३८.६० दलघमी साठ्याच्या तुलनेत २८.१४ दलघमी साठा शिल्लक आहे. ही ७२.९० टक्केवारी आहे. जिल्ह्यात ७७ लघुप्रकल्प आहेत. या प्रकल्पांत संकल्पित १७९.८४ दलघमी साठ्याच्या तुलनेत १२५.१२ दलघमी साठा आहे. ही ६९.५७ टक्केवारी आहे. दरम्यान २४ तासांत १७.७ मिमी पाउस पडला. सर्वाधिक ४४ मिमी पाऊस वरुड तालुक्यात पडला. अमरावती १७.२, भातकुली १६.४, नांदगांव ७.२, चांदूररेल्वे ३.२, धामणगांव रेल्वे ९, तिवसा ८.१, मोर्शी १६.४,अचलपूर २८.४, चांदूरबाजार २०,दर्यापूर ६.४, अंजनगांव ११, धारणी २५.४ व चिखलदरा तालुक्यांत ३५.४ मिमी पाऊस पडला. जिल्ह्यात १ जून ते २ आॅगस्ट या कालावधीत ४४३.७ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ६७५.८ मिमी पाऊस पडला. ही १५२.३ टक्केवारी आहे. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत ८३ टक्के पाऊस पडला आहे. जिल्ह्यात सर्वच तालुक्यांनी पावसाची सरासरी पार केली असली तरी मोर्शी, अचलपूर व दर्यापूर तालुक्यांनी पावसाची वार्षिक सरासरी ओलांडली आहे. पावसाच्या टक्केवारीत चिखलदरा माघारले जिल्ह्यात सद्यस्थितीत १५२.३ टक्के पाऊस पडला. सर्वाधिक १८टक्के पाऊस दर्यापूर तालुक्यात पडला. अंजनगांव १८२, मोर्शी १२३, धारणी १६२, तिवसा १६१, अचलपूर १८०, अमरावती १४०, भातकुली १२६, नांदगांव १४२, चांदूररेल्वे १५८, धामणगांव १४५, वरुड येथे १११ टक्के पाऊस पडला. विदर्भाचे नंदनवन म्हणविणाऱ्या चिखलदऱ्यात फक्त १२४ मिमी पाऊस पडला. हा तालुका पावसाच्या टक्केवारीत जिल्ह्यात १३ व्या स्थानी आहे. धरणातून असा होत आहे विसर्ग उर्ध्व वर्धा धरणाचे तेराही दरवाजे बुधवारी सकाळी ८ वाजता ४० से.मी.ने उघडण्यात आले. या धरणातून ८२१ घमीप्रसे पाण्याचा विसर्ग होत आहे. शहानूर प्रकल्पाचे २ दरवाजे १० सेमीने उघडण्यात आले. येथे १२.२५ घमीप्रसे पाण्याचा विसर्ग होत आहे. पूर्णा प्रकल्पाचे ९ दरवाजे १० सेमीने उघडण्यात आले. येथे ६७.६९ घमीप्रसे पाण्याचा विसर्ग होत आहे.