शहरं
Join us  
Trending Stories
1
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
2
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
3
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
4
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
5
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
6
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
7
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
8
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
9
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
10
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
11
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
12
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
13
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
14
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर
15
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
16
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
17
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
18
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
19
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
20
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची

चार सभापती अद्यापही विषय समितीबाहेरच

By admin | Updated: January 3, 2017 00:18 IST

जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील दहा विषय समित्यांवर १२ डिसेंबर २०१४ पासून अद्यापही चार पंचायत समितीच्या सभापतींना प्रतिनिधीत्व देण्यात आले नाही.

जिल्हा परिषद : अडीच वर्षांपासून त्यांची बोळवणच, कार्यकाळही संपुष्टात येण्याच्या मार्गावर जितेंद्र दखने अमरावती जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील दहा विषय समित्यांवर १२ डिसेंबर २०१४ पासून अद्यापही चार पंचायत समितीच्या सभापतींना प्रतिनिधीत्व देण्यात आले नाही. त्यामुळे सत्ताधारी विरोधकांवर भारी पडल्याची चर्चा मिनीमंत्रालयात सुरू आहे. जिल्हा परिषद सभागृहाची निर्वाचित सदस्य संख्या ५९ आहे. पंचायत समितींच्या सभापतींची संख्या १४ आहे, तर झेडपी पदाधिकाऱ्यांची संख्या ६ आहेत. दहा विषय समित्यांवर असलेल्या सदस्यांची एकूण संख्या ८३ आहे. अडीच वर्षांच्या सत्ताकाळात अद्यापपर्यंत ४ विषय समित्यांमध्ये ८ जागा रिक्त आहेत. विशेष म्हणजे या समित्यावर जि.प. आणि पं. समितींच्या सभापतींना प्रतिनिधित्व देण्याची तरतूद आहे. परंतु अद्यापही चार पंचायत समितीच्या सभापतींना एकाही विषय समितीवर स्थान देण्यात आले नाही. यामध्ये तिवसा पंचायत समितींच्या सभापती अर्चना वेरूळकर, चांदूररेल्वेचे सभापती किशोर झाडे, धामणगाव रेल्वेच्या सभापती गणेश राजनकर आणि धारणीच्या सभापती सुनीता पटेल या चार सभापतींची १४ डिसेंबर २०१४ रोजी सभापती पदावर निवड झाली आहे. मात्र या निवडीपूर्वीच जि.प.त विषय समितीवर प्रतिनिधीत्व निवडण्यासाठी १२ डिसेंबर २०१४ तर १६ फेब्रुवारी २०१५ व त्यानंतरही दोन विशेष सभा घेण्यात आल्यात. मात्र तरीही भाजपाच्या या चार पंचायत समितींच्या सभापतींना जि.प. विषय समितीवर प्रतिनिधीत्वाची संधी दिली नाही. सुरूवातीला वाद, नंतर चुप्पी जिल्हा परिषदेत अडीच वर्षांच्या शेवटच्या टप्यात नव्याने विषय समितीवर सदस्य निवड प्रक्रियेवरून काँग्रेस व विरोधी पक्षात सुरूवातीला यासाठी बोलविण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत चांगलाच वाद झाला. यावरच हा प्रकार थांबला नाही तर विभागीय आयुक्ताकडे यावर दाद मागगितली. तत्कालीन आयुक्तांनी आपले मार्गदर्शन लेखी कळवून निर्णय घेण्याचे सुचविले होते. परंतु काही महिन्यांपासून या वादावर कुणीही भाष्य केले नाही. आता तर सर्वांनीच चुप्पी साधल्याचे दिसून येत आहे.