शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
3
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
4
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
5
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
6
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
7
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
8
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
9
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
10
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
11
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
13
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
14
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद
15
"मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए", असं का म्हणाले अशोक सराफ?
16
१० सेकंदाच्या व्हिडीओनं अब्जाधीश कंपनीच्या सीईओंनी गमावलं पद, पत्नीनेही उचललं मोठं पाऊल!
17
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
18
गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार!
19
गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार
20
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 

वाढीव मोबदल्यासाठी ‘चार पेटी’ची सुपारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 23:24 IST

कंत्राटी स्वच्छता कामगारांना ४२३ रुपये दैनिक मोबदला हवा असेल, तर प्रति कंत्राटदार १० हजार रुपये जमा करण्याचे निर्देश मिळाल्याने कंत्राटदार असोसिएशनमध्ये खळबळ माजली आहे.

ठळक मुद्देप्रति कंत्राटदार १० हजार रुपये : स्थायीच्या निर्णयानंतर ‘डिलिव्हरी’

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कंत्राटी स्वच्छता कामगारांना ४२३ रुपये दैनिक मोबदला हवा असेल, तर प्रति कंत्राटदार १० हजार रुपये जमा करण्याचे निर्देश मिळाल्याने कंत्राटदार असोसिएशनमध्ये खळबळ माजली आहे. या प्रत्येकी १० हजारांच्या मागणीला साफसफाई कंत्राटदार असोसिएशनच्या ज्येष्ठ सदस्यांनी दुजोरा दिला. सोमवारी ही एकत्रित रक्कम संबंधिताकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.कंत्राटी स्वच्छता कामगारांना १ नोव्हेंबरपासून ४२३ रुपये दैनिक मोबदला दिल्यास आपण काम करू, असा इशारा अमरावती मनपा साफसफाई कंत्राटदार असोसिएशनने २४ आॅक्टोबरला आयुक्तांना दिला होता. त्यावर स्वच्छतेत अडसर निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने ४२३ रुपयांसाठी हिरवी झेंडी दिली. यापूर्वी महिला कामगारांना १५० ते १७५ व पुरुष कामगारांना २०० ते २२५ रुपये मिळत होते. मात्र, आता नव्याने ४२३ रुपये रोजंदारी ठरविण्यात आली. यात संबंधित कंत्राटदारांनाही लाभ होणार आहे. नेमकी हीच बाब हेरून सत्ताधीशांमधील एकाने मर्जीतील साफसफाई कंत्राटदाराला विश्वासात घेऊन ‘वसुली’चा गेम खेळला. मर्जीतील ‘संजय’ दृष्टी लाभलेल्या कंत्राटदाराच्या माध्यमातून प्रतिकंत्राटदार १२ हजार रुपये गोळा करण्याचे आदेश देण्यात आले. हा निरोप सर्व ४३ कंत्राटदारांना गेला. चौघांचा अपवाद वगळता अन्य कंत्राटदारांकडे एक-एका प्रभागाचे कंत्राट आहे. तडजोडीअंती ती रक्कम १२ हजारांहून १० हजारांपर्यंत कमी करण्यात आली.४३ कंत्राटदारांचे ४ लाख ३० हजार रूपये होतात. चौघांंचा अपवाद वगळता अन्यकडे एकच प्रभागाची जबाबदारी असल्याने ही रक्कम चार लाखांच्या घरात जाईल. पुढील सहा महिन्यांसाठी प्रतिकामगार ४२३ रुपये मिळणार असल्याने अपवाद वगळता कुणाही कंत्राटदाराने ना-नुकुर केले नाही.संघटनेच्या म्होरक्याकडून महापालिकेत ‘सुभा’ चालविणाºया व्यक्तींकडे ही एकत्रित रक्कम सोपविली जाईल. या घटनाक्रमाला नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर अनेक कंत्राटदारांनी दुजोरा दिला आहे.असे आहे संभाव्य गणितजी मल्टिनॅशनल कंपनी शहराच्या दैनंदिन स्वच्छतेचे कंत्राट घेईल, ती कंपनी अमरावतीत प्रत्यक्ष कामकाजासाठी ‘सबकॉन्ट्रॅक्टर’ नेमेल. काही सुपरवायझर वगळता स्वच्छता कामगारांमध्ये स्थानिकांचा भरणा असेल. ते स्थानिक येथीलच कंत्राटदाराकडून घेतले जातील. हा संभाव्य फायदा लक्षात घेवून कंत्राटदाराचा एक म्होरक्या सत्ताधीशांजवळ पोहोचला आहे. अन्य साफसफाई कंत्राटदारांना पद्धतशीरपणे दूर ठेवण्यासाठीचा हा डाव आहे.साफसफाई कंत्राटदार संघटनेत असंतोषदैनंदिन स्वच्छतेच्या एकत्र कंत्राटाला आमसभेत मंजुरी मिळाल्यानंतर कंत्राटदार संघटनेत धुसफूस वाढली आहे. अध्यक्षांबाबत असंतोष उफाळला असून, पुढील बैठकीत अध्यक्ष बदलण्याचे संकेतही मिळाले आहेत. तथापि, पुढील तीन-चार महिन्यानंतर ‘कंत्राटदार असोसिएशन’च संपुष्टात येणार असल्याने अध्यक्ष बदलाचा विषय गौण असल्याची प्रतिक्रियाही उमटली आहे. संघटनेतील अन्य सभासद कंत्राटदारांना अंधारात ठेवून एकच व्यक्ती मलिदा लाटत असल्याने या असंतोषात भर पडली आहे.