शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

मिनीमहापौरांच्या मुलासह चौघांना अटक

By admin | Updated: June 21, 2014 01:13 IST

क्राईम ब्रान्चने एका दमदार कारवाई अंतर्गत मिनी महापौरांच्या मुलासह चार आरोपींना अटक केली.

अमरावती : क्राईम ब्रान्चने एका दमदार कारवाई अंतर्गत मिनी महापौरांच्या मुलासह चार आरोपींना अटक केली. पोलीस आयुक्त सुरेशकुमार मेकला यांच्या मार्गदर्शनात केलेले हे तपासकार्य कौतुकास्पद ठरले. नावेद ऊर्फ सोनु शहा हबीब शहा (२३, रा. नुराणी चौक) , उमेर मीर्झा जफर बेग (२३, रा. उस्मानिया मशिद कॉर्टर), मो. रिझवान शेख उस्मान (२७,रा. हैदरपुरा, बाब चौक) व इमरान खान नूर खान (२३,रा. वलगाव रोड) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांनी दोन चोऱ्यांची कबुली दिली.मालवीय चौकातील आदिदास शोेरुम अज्ञात चोरट्यांनी ४ जानेवारी रोजी फोडून बॅग, डीओ, टी-शर्ट, जोडे व ४४ हजार रुपये रोख असा एकूण १ लाख ६१ हजार ३४७ रुपयांचा माल चोरुन नेला होता. याप्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी आदिदास शोरुमचे संचालक मो. अबरार मो. सिद्धीकी (रा. पिकीज्या कॉलनी) यांच्या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्यांविरुद्द गुन्हा नोंदविला. या घटनेचा पोलिसांनी वैज्ञानिक पद्धतीने तपास करुन आरोपी नावेद शहा, उमेर मिर्झा, मो. रिझवान यांना अटक केली. आरोपींनी चोरीची कबुली दिली. घटनेनंतर आरोपींनी चोरी केलेला माल वाटुन घेतला होता. यापैकी काही माल त्यांनी परिचयाच्या व्यक्तींना विकला. घरझडतीदरम्यान पोलिसांनी या आरोपींच्या घरुन आदिदास कंपनीच्या ५ बॅग, २ जोडे, २ डीओ, ३ टी शर्ट जप्त केले. सायंस्कोर येथील राष्ट्रीय माध्यमिक सर्वशिक्षण कार्यालयात ७ सप्टेंबर २०१३ रोजी चोरी करुन तेथून ४३ हजार ८०० रुपयांचा माल चोरुन नेल्याची कबुलीही या आरोपींनी दिली. उमेर, मो. रिझवान यांच्यासह इमरान खान यांनी मिळवून ही चोरी केल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी इमरानला अटक करुन त्याच्याकडून ३ सीपीयु, ३ मॉनेटर व १ की बोर्ड जप्त केले. आरोपींकडून आणखी काही चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे. सुरेशकुमार मेकला यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी राठोड, राजेश राठोड, शेख नबी, एन. के. चव्हाण, किशोर महाजन, संतोष यादव, शेख, संग्राम भोजने, स्नेहल राऊत यांनी केली. मशिद परिसरात रचला होता सापळाआरोपी नावेद ऊर्फ सोनू शहा हा मिनीमहापौरांचा मुलगा आहे. त्याच्यावर यापूर्वी काही पोलीस ठाण्यात दुखापतीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याला काही दिवसांपूर्वी शहर कोतवाली पोलिसांनी अटक केली. त्याने आदिदास कंपनीचे टी-शर्ट व जोडा परिधान केला होता. याची गुप्त माहिती गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्याला गुरुवारी येथील न्यायालयात हजर करण्यात येणार होते. त्याने आदिदास शोरुममध्ये चोरी केल्याचा संशय पोलिसांना आला. यामध्ये उमेर मिर्झा याचाही समावेश असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी दोन दिवसांपासून उमेर मिर्झा याच्या घरासमोर सापळा रचला. परंतु तो पोलिसांच्या हाती लागला नाही. गुरुवारी सायंकाळी तो मशिदीमध्ये येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी पुन्हा उस्मानिया मशिदीसमोर सापळा रचला. तेथे उमेर मिर्झा पोहचताच पोलिसांनी त्याला शिताफिने अटक केली. अटकेदरम्यान त्याने पोलिसांना आदिदास व सायंस्कोर येथे चोरी केल्याची कबुली देऊन त्याच्या साथीदारांची नावे पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी वरील आरोपींना अटक केली.