शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

अस्वल हत्येप्रकरणी चौघांना अटक

By admin | Updated: January 26, 2017 00:37 IST

नजीकच्या वडुरा शेतशिवारातील अस्वल हत्येप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली.

आरोपींना वनकोठडी : तिघांनी वाटून घेतले चार पंजे परतवाडा : नजीकच्या वडुरा शेतशिवारातील अस्वल हत्येप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली. त्यांनी अस्वलाचे तोडून नेलेले चार पंजे, कुऱ्हाड, तार आदी साहित्य मंगळवारी रात्री वनाधिकाऱ्यांनी जप्त केले आहे. वडुरा शेतशिवारातील फाटकर यांची शेती लागवडीने करणारा बन्सी गोटू राजणे (५० रा. पांढरी), कालू रामसिंग परते (३९, रा.हरमहू भैसदेही, मध्यप्रदेश), बन्सी शिवराम मावस्कर (४८) व गंगाराम मनसू दारसिंबे (६० दोन्ही रा. बेलखेडा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. मंगळवारी सकाळी १० वाजता वडुरा शेतशिवारात एका अस्वलाची विद्युत तारेचा जिवंत प्रवाह सोडून हत्या करण्यात आली होती. यासंपूर्ण प्रकाराने वनविभागासह परिसरात खळबळ उडाली होती. याप्रकरणी वनाधिकाऱ्यांनी चारही आरोपींना अटक करून त्यांचेविरुद्ध १९७२ वन्यजीव अधिनियम ९,३९,४४, ४८,४९,५१ अन्वये गुन्हे दाखल केले आहे. अचलपूर न्यायालयात बुधवारी हजर केले असता न्यायालयाने त्यांना २७ जानेवारीपर्यंत वनकोठडी सुनावली आहे. अस्वलाच्या नखांचा गळ्यात ताईत म्हणून वापर करणे शुभ असल्याची अंधश्रद्धा असल्याने अस्वलाचे पंजे कापून नेल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. आरोपींचा छडा लावण्यासाठी वनधिकाऱ्यांनी सर्वप्रथम बन्सी राजनेला अटक केली. त्याने उर्वरित आरोपींची नावे सांगितली. सहाय्यक वनसंरक्षक आर.जी.बोंडे, आरएफओ शंकर बारखडे, वनपाल बी.आर.झामरे, जे.डी.काळे, जे.टी. भारती, एन.व्ही.ठाकरे, कुकले सनवासे आदींनी ही कारवाई केली. शुभ चिन्हासाठी ठेवले अवयवआरोपींनी शेतात अवैधरित्या जिवंत विद्युत प्रवाह सोडला होता. त्यामध्ये अडकून सोमवारी मध्यरात्री अस्वल ठार झाले. मंगळवारी पहाटे आरोपींनी या मृत अस्वलाच्या हाताचे व पायाचे पंजे कुऱ्हाडीने निर्दयीपणे कापले. त्यानंतर बन्सी मावस्करने दोन, कालू पराते व गंगाराम दारसिबें याने प्रत्येकी एक याप्रमाणे हाताच्या व पायाच्या पंजाचे शुभ चिन्हासाठी वाटप केले.