जिल्हा परिषद : अधिकारी व पदाधिकाऱ्यांना सुनावलेअमरावती : एकीकडे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा भरात जलयुक्त शिवारची कामे झपाटयाने करायची अशी इच्छा व्यक्त करणाऱ्याना प्रशासनाने विकासाच्या फाईल तब्बल सहा सहा महिने पेडींग ठेवून कुठला विकास साध्य केला. असा संताप जनक प्रश्न जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुरेखा ठाकरे यांनी सोमवारी विशेष सभेत उपस्थित केला. जिल्हा परिषद सिंचन विभागाला जिल्हा नियोजन समितीकडून सन २०१३-१४ मध्ये सिंचनाचे कामासाठी ४५ लाख रूपये मंजूर केले होते. या निधीतून धारणी तालुक्यातील चिचघाट येथे नवीन कोल्हापुरी बंधारा मंजूर करण्यात आला होता. यासाठी डिसेंबर २०१४ रोजी सिंचन विभागाने निविदा काढून स्विकृतीसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य शिल्लेदाराकडे ही फाईल स्वाक्षरीसाठी पाठविली. यावर उशिरा का होईना स्वाक्षरी होताच सिंचन विभागाने संबंधित कंत्राटदारास काम सुरू करण्याबाबत पत्र दिले. मात्र या कामाचा पिरेड निघून गेल्याने कंत्राटदारांनी काम करण्यास नकार असल्याचे पत्र प्रशासनाला दिले. त्यामुळे प्रशासनाने पुन्हा याच कामासाठी फेरनिविदा काढण्याची कारवाई सुरू केली. आणि निविदा काढल्यात त्यानंतर स्विकृत मान्यतेसाठी ही फाईल प्रशासनाने शिल्लेदाराकडे पाठविली मात्र त्यावर १८० दिवसाचा कालावधी लोटून गेल्यावरही निर्णय का झाला नाही. असा मुद्दा सुरेखा ठाकरे यांनी सभेत रेटून धरत यावर अध्यक्ष व सीईओ यांनी उत्तर देण्याची मागणी त्यांनी केली. जिल्ह्य़ाच्या विकासाचे पैसे अशा प्रकारे खर्च होत नाहीत. आणि दुसरीक डे जिल्हा नियोजन समितीचा हा निधी दुसऱ्या कामावर वळविला तर यातून काय साध्य होते हेच आपल्याला समजत नाही. त्यामुळे अशा प्रकारे विकासाचे फाईल पेडींग ठेवल्याने विकासाची कामे कशी गती होणार त्यामुळे अगोदर ही परिस्थिती बदलविण्याची गरज आहे.
पेंडिंग फाईलीच्या मुद्यावर माजी अध्यक्ष संतापल्या
By admin | Updated: April 26, 2016 00:15 IST