शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

वनगुन्ह्यातील जप्त पोकलँड सरकारजमा करण्यास वनाधिकाऱ्यांचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:14 IST

अनिल कडू परतवाडा : अंजनगाव वनपरिक्षेत्रातील राखीव वनात, वन उत्पादनाचे (गाळ, मुरूम) विनापरवानगी उत्खनन करणाऱ्या वनगुन्ह्यात जप्त पोकलँडला सरकारजमा ...

अनिल कडू

परतवाडा : अंजनगाव वनपरिक्षेत्रातील राखीव वनात, वन उत्पादनाचे (गाळ, मुरूम) विनापरवानगी उत्खनन करणाऱ्या वनगुन्ह्यात जप्त पोकलँडला सरकारजमा करण्यास सहायक वनसंरक्षकांनी नकार दिला आहे.

अंजनगाव वनपरिक्षेत्रातील राखीव वनात हा गुन्हा घडला. वनविभागाची परवानगी न घेता राखीव वनात पोकलँडद्वारे अवैध उत्खनन करून संबंधितांनी ट्रकद्वारे गाळ व मुरमाची अवैध वाहतूक केल्याचे मुरुमाचे (वनउत्पादन) उत्खनन करून नैसर्गिक नाल्यांमध्ये टाकून नाल्यात अडथळा निर्माण केल्याचे सहायक वनसंरक्षकांना मान्य आहे. मेळघाट प्रादेशिक वनविभाग परतवाडा येथील वनसर्व्हेअर आणि वनपरिक्षेत्राधिकारी अंजनगाव यांच्यासह संबंधित वनरक्षक व वनपालाचे स्पष्ट अहवालही आहेत. यात प्रत्यक्षदर्शी दोन साक्षीदारही आहेत. तरीदेखील जप्त पोकलँडद्वारे राज्य शासनाची मालमत्ता असलेल्या इमारती लाकूड, चंदन लाकूड, जळाऊ लाकूड, कोळसा किंवा इतर अधिसूचित वन उत्पादनाबाबत वनगुन्हा घडलेला नाही, असे नमूद करून जप्त पोकलँड सरकारजमा करण्याबाबतचा वनपरिक्षेत्र अधिकारी अंजनगाव यांचा अर्ज, २८ जुलै २०२१ ला सहायक वनसंरक्षकांनी फेटाळला. असे करताना जैवविविधता कायद्याचा मात्र त्यांना विसर पडला. सहायक वनसंरक्षकांनी पारित केलेला हा आदेश सध्या वनविभागांतर्गत चर्चेत आहे. व्हाॅट्सॲप ग्रुपवरही तो बऱ्यापैकी व्हायरल होत आहे.

बॉक्स

असा घडला वनगुन्हा

संबंधितांनी राखीव नातील सर्वे क्रमांक ०५ मधील सावरपाणी धरणातून वनउत्पादनाचे पोकलँड मशिनच्या साह्याने अवैधरीत्या उत्खनन केले. विनापरवानगी राखीव वनखंड क्रमांक १०६५ आणि १०६६ मध्ये नवीन रस्ता तयार केला. वन उत्पादनाची वनाबाहेर वाहतूक केली. यावरून २१ एप्रिल २०२१ रोजी वनगुन्हा नोंदविल्या गेला.

--

परवानगी आधीच सर्व काही

१७ एप्रिल २०२१ ला वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी मोका स्थळाची पाहणी केली. तेव्हा त्यांना परवानगी आधीच सावरपाणी धरणातून गाळ, मातीची वाहतूक केल्याचे निदर्शनास आले. याकरिता नवीन कच्चा रस्ता तयार केल्याचेही त्यांना आढळून आले. सदर उत्खनन केलेले ठिकाण व नवीन कच्चा रस्ता तयार केलेले ठिकाण हे वनजमीन असल्याचे ही त्यांचे निदर्शनास आले.

--

राखीव वनात घडला गुन्हा

वनपरिक्षेत्र अधिकारी अंजनगाव आणि वनविभागाच्या विभागीय कार्यालयातील वनसर्व्हेअर व वनकर्मचाऱ्यांनी २१ एप्रिल २०२१ रोजी परत घटनास्थळी जाऊन तपासणी केली. उत्खनन झालेले ठिकाण हे चिंचोना नियत क्षेत्रातील सर्वे क्रमांक ०५ मधील राखीव वनात झाल्याचे तपासणीत त्यांना आढळून आले. नवीन तयार केलेला कच्चा रस्ता सावरपाणी नियतक्षेत्रातील वनखंड १०६५ व १०६६ मधील राखीव वनात तयार केल्याचेही आढळले.