शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी वनविभागाचा चौकशीचा फार्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:13 IST

कॉमन /गणेश वासनिक अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा हरिसाल येथील वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी वनखात्याने नेमलेली चौकशी समिती केवळ ...

कॉमन /गणेश वासनिक

अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा हरिसाल येथील वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी वनखात्याने नेमलेली चौकशी समिती केवळ फार्स ठरली. चार महिन्यांचा कालावधी लोटूनही अहवाल सादर करू शकली नाही. दुसरीकडे आराेपी निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी हे जामिनावर सुटून मुक्त झाले आहेत.

दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी वनबलप्रमुख पी. साईप्रसाद यांनी ‘दूध का दूध, पानी का पानी’ होण्यासाठी वनविभागाकडून नऊ सदस्यीय समितीचे गठन केले होते. या समितीला वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी दिला होता. मात्र, आता चार महिने लोटूनही वनविभागाची समिती अहवाल सादर करू शकली नाही. याबाबत शंका उपस्थित होत आहे. त्यामुळे वनखात्याची समिती गठित करणे हा केवळ फार्स आहे, असा आक्षेप आता खरा ठरू लागला आहे. अहवाल सादर न करणे म्हणजे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी, उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांना पुरेपूर वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट होते.

---------------------

अशी होती वनविभागाची चौकशी समिती

समितीचे अध्यक्ष प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.के. राव, सहअध्यक्ष अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विकास गुप्ता, वनविकास महामंडळाच्या मुख्य महाव्यवस्थापक मीरा (अय्यर) त्रिवेदी, मेळघाटच्या डीएफओ अधिकारी पीयूषा जगताप, एसीएफ ज्योती पवार, आरएफओ विजया कोकाटे, सेवानिवृत्त डीएफओ किशोर मिस्त्रीकोटकर, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण यांचा समावेश आहे. या समितीच्या तीन उपसमिती गठित करण्यात आल्या होत्या.

-----------

आयपीएस प्रज्ञा सरवदे यांचा महिनाभरातच अहवाल सादर

राज्य शासनाने गठित केलेल्या आयपीएस प्रज्ञा सरवदे यांच्या नेतृत्वातील समितीने महिनाभरातच शासनाकडे अहवाल सादर केला आहे. सरवदे यांनी मुंबईहून अमरावती गाठले. त्यानंतर हरिसाल येथे घटनास्थळी भेट दिली. दीपाली यांचे पती राजेश माेहिते यांची साक्ष नोंदविली. दरम्यान काही वनाधिकारी, कर्मचाऱ्यांशी भेटी घेतल्या. वास्तव जाणून घेतल्यानंतर अमरावती जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात बसून अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांच्या अटकेचे आदेश दिले होते, हे विशेष. मात्र, चार महिने झाल्यानंतरही वनविभागाची समिती साधा अहवालदेखील सादर करू शकली नाही, हे आश्चर्य आहे.