शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याच्या २५ टक्के भूभागावर वनक्षेत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:10 IST

अमरावती : कोरोनाने निसर्गाच्या सान्निध्यात जाण्याचा मूूलमंत्र दिला आहे. जिल्ह्याच्या सुदैवाने येथे एकूण २५ टक्के भूभागावर वनक्षेत्र आहे. महेंद्री ...

अमरावती : कोरोनाने निसर्गाच्या सान्निध्यात जाण्याचा मूूलमंत्र दिला आहे. जिल्ह्याच्या सुदैवाने येथे एकूण २५ टक्के भूभागावर वनक्षेत्र आहे. महेंद्री व पोहरा-मालखेड हे दोन्ही जंगले अभयारण्य व्हावी, असे तेथील वन्यजीवन आहे. भविष्यात तसे झाल्यास जिल्ह्यात पर्यावरण संवर्धनात एक मोठी उपलब्धी होईल. शनिवारी असलेल्या पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर ही मागणी अमरावतीकरांनी बुलंद केली आहे.

अमरावती जिल्ह्याचे क्षेत्रफळ १२२३४ चौरस किमी असून त्यापैकी वनक्षेत्र हे ३३०० चौरस किमी क्षेत्रावर पसरले आहे. यामध्ये वन्यजीव संरक्षित क्षेत्र असलेल्या मेळघाटचे जंगल, महेंद्री राखीव जंगल, पोहरा-मालखेड राखीव जंगल व त्या भोवतालचे क्षेत्र तसेच सालबर्डी परिसरातील जंगल यांचा समावेश आहे. याशिवाय जिल्ह्यात काही गवताळ माळरानसुद्धा अस्तित्वात आहे. या वनक्षेत्रामुळे व देशातील सर्वात जुना व राज्यातील आकाराने सर्वांत मोठा असा व्याघ्र प्रकल्प जिल्ह्यात असल्याने येथील वनक्षेत्र समाधानकारक आहे. यातील अर्ध्या क्षेत्रास संवर्धनाचा दर्जा प्राप्त असल्याने त्याचे कायद्याने संवर्धन होत आहे, ही समाधानाची बाब आहे. मात्र, वरूड तालुक्यातील महेंद्री जंगल आणि इतर जंगलांचा संवर्धनाअभावी ऱ्हास होत आहे. महेंद्री जंगल हे मेळघाट व पेंच या दोन जंगलांना जोडणारा व्याघ्र भ्रमण मार्ग आहे. त्यामुळे या जंगलाचे संवर्धन होणे गरजेचे आहे. या जंगलास अभयारण्याचा दर्जा मिळावा, यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. तसा प्रस्तावसुद्धा राज्य शासनाच्या वन्यजीव मंडळाला पाठविण्यात आला होता. परंतु त्यावर निर्णय होऊ शकला नाही. महेंद्री व पोहरा-मालखेड हे दोन्ही जंगले अभयारण्य व्हावी, असे तेथील वन्यजीवन आहे. भविष्यात तसे झाल्यास जिल्ह्यात पर्यावरण संवर्धनात एक मोठी उपलब्धी होईल.

बॉक्स

रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौरऊर्जेचा वापर

गावखेड्यातील पाण्याचे नियोजन यावर विशेष लक्ष देऊन भूजल पातळी पुन्हा वाढवण्यावर भर द्यावा लागेल. त्यासाठी शहर व गावातील रहिवासी असलेल्या प्रत्येकाला आपल्या घरावर पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याची (रेन वाटर हार्वेस्टिंग) यंत्रणा करावी लागेल. सौरऊर्जेचा वापर वाढवून वीज मिळविण्यासाठी होणाऱ्या प्रदूषणाला आला घालावे लागेल. पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने वाटचाल न झाल्यास कोरोनासारख्या महामारीने भविष्यात मानवाचे अस्तित्व या पृथ्वीवरून नष्ट केले, तर नवल वाटायला नको, असे मत पर्यावरण अभ्यासक जयंत वडतकर यांनी व्यक्त केले.

------------------------