शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

‘फॉरेन रिटर्न’ ३५ व्यक्तींची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 06:00 IST

कोरोना विषाणूचा जिल्ह्यात शिरकाव होऊ नये, याच्या पूर्वनियोजनाच्या दृष्टीने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा-२००५ लागू केला. यातंर्गत १२ मार्चला पर्यटन व्यवसायाशी संबंधित व्यावसायिकांची बैठक बोलाविली होती. या व्यावसायिकांना देशात व परदेशात गेलेल्या आणि जिल्ह्यात परतलेल्या व आगामी काळात परतणाऱ्या नागरिकांची माहिती मागितली.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात २५ फेब्रुवारी ते १६ मार्च दरम्यान परदेशातून परतलेल्या नागरिकांची माहिती टूर्स अँड ट्रॅव्हल्स असोसिएशन (अट्टा) द्वारे जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली. या सर्व नागरिकांची वैद्यकीय पथकाद्वारे तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मंगळवारी दिले आहेत. या सर्व प्रवाशांसोबत सौजन्याने बोला व आवश्यकता असल्यास क्वारंटाइन कक्षात किंवा स्वत:च्या घरीच स्वतंत्रपणे ठेवण्याच्या सूचना आहेत.कोरोना विषाणूचा जिल्ह्यात शिरकाव होऊ नये, याच्या पूर्वनियोजनाच्या दृष्टीने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा-२००५ लागू केला. यातंर्गत १२ मार्चला पर्यटन व्यवसायाशी संबंधित व्यावसायिकांची बैठक बोलाविली होती. या व्यावसायिकांना देशात व परदेशात गेलेल्या आणि जिल्ह्यात परतलेल्या व आगामी काळात परतणाऱ्या नागरिकांची माहिती मागितली. या अनुषंगाने पहिली ८९ व दुसरी ३५ नागरिकांची यादी ‘अट्टा’ने जिल्हा प्रशासनाला दिली. पहिल्या यादीतील नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये कुणालाही आयसोलेशन किंवा क्वारंटाइनमध्ये ठेवण्याची गरज नसल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.आता दुसºया यादीतील नागरिकांची तपासणी सुरू झालेली आहे. यादीमधील बरेचसे नागरिक स्वत:हून तपासणी करून घेत असल्याचे दिसून येत आहे.डीपीसीतून २.५९ कोटींच्या वैद्यकीय साहित्याची मागणीजिल्हा नियोजन समितीमधून कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी २.५९ कोटी रुपयांच्या वैद्यकीय साहित्य व उपकरणाची मागणी जिल्हा शल्यचिकित्सकांनी जिल्हाधिकारी तथा डीपीसीचे सचिव शैलेश नवाल यांच्याकडे केली. यामध्ये ११ न्यूनॅटल व्हेंटिलेटर मागणी केली आहे.जिल्हाधिकाऱ्यांचे पथकाला आदेश : आवश्यकता असल्यास क्वारंटाईनमध्येदुसऱ्या यादीत या देशात झाला प्रवास‘अट्टा’ने दिलेल्या दुसऱ्या यादीत कतार एअर लार्इंन्सने १५, एअर अरेबियाने २० नागरिकांनी प्रवास केला आहे. जॉर्जिया, बहरीन, बाकू, शारजाह, यूएई, कतर, बोस्टन, दोहा, डल्लास, साओपोलो, ओमान, यूएसए, दुबई, कुवैत, स्टॉकहोम आदी देशांतंर्गत २५ फेब्रुवारी ते १६ मार्च दरम्यान त्या देशात प्रवास केल्याची माहिती ‘अट्टा’ने दिली असल्याने त्यासंबंधी तपासणी सुरू झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारी