शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

नाल्यात कचरा टाकल्यास फौजदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 22:23 IST

शहरात डेंग्यू व अन्य कीटकजन्य आजाराने डोके वर काढल्याच्या पार्श्वभूमिवर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. नाल्यात कचरा टाकणाऱ्यांवर प्रशासनाने फौजदारीचा इशारा दिला आहे. संबंधितांविरुद्ध फौजदारीसोबतच दंडात्मक कारवाईचेही आदेश स्वास्थ्य निरीक्षकांना दिले.

ठळक मुद्देदंडाचा बडगा : महापालिका स्वास्थ्य निरीक्षकांना आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात डेंग्यू व अन्य कीटकजन्य आजाराने डोके वर काढल्याच्या पार्श्वभूमिवर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. नाल्यात कचरा टाकणाऱ्यांवर प्रशासनाने फौजदारीचा इशारा दिला आहे. संबंधितांविरुद्ध फौजदारीसोबतच दंडात्मक कारवाईचेही आदेश स्वास्थ्य निरीक्षकांना दिले.महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी मंगळवारी साथीचे आजार, त्यावरील उपाययोजना व जनजागृतीबाबत वैद्यकीय आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांचेकडून माहिती जाणून घेतली. त्यात आरोग्य व स्वच्छता विभागाने आतापर्यंत केलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला. मनुष्यबळ व वाहने लावून नाल्यातील गाळ काढून घेण्यात आला आहे. अंबादेवी परिसरातील गाळ व कचरा जेसीबी व पोकलॅन्डद्वारे सफाई करून नाल्याचे पात्र वाढवण्यात आले. पिल्लरला अडकलेला कचरा वरचेवर काढण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळली आहे. शहर प्लास्टिकमुक्त करण्याकरिता ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक व स्वास्थ्य निरीक्षक यांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.कचरा उचलणे, झाडाच्या तुटलेल्या फांद्या, पालापाचोळा, गाळ त्वरित वाहून नेण्याच्या सूचना अधिनिस्थ यंत्रणेला दिल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. मृत जनावरे २४ तासांत उचलण्याची कार्यवाहीसह मोठे नाले व नाल्यातून कचरा काढण्याची कारवाई निरंतर सुरु असल्याचा दावा आरोग्य प्रशासनाकडून करण्यात आला आहे.कचऱ्यामुळे नाला ‘चोकअप’काही नागरिक, दुकानदार नाल्यात मोठ्या प्रमाणात कचरा, पूजेचे साहित्य, हार, कपडे, बांधकामाचे मलमा, पालापाचोळा टाकत आहे. या कचऱ्यामुळे नाला परिसरात पाणी घुसण्याची स्थिती निर्माण होऊ शकते. मागील वर्षी नमुना व मुधोळकर पेठ परिसरात नाल्याचे पाणी शिरुन मोठी वित्तहानी झाली होती. त्यामुळे स्थानिक नागरिकांनीही नाल्यात कोणाला कचरा टाकू देऊ नये, स्वत:ही टाकू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.नाल्यांमध्ये कचरा टाकू नये. कचरा डस्टबिनमध्ये जमा करून घंटीकटल्यातच टाकावा. कचरा इतरत्र फेकू नये. शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करावे.- संजय निपाणे,आयुक्त, महापालिका