शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

‘रघुवीर’च्या मुख्य कारखान्यावर धाड

By admin | Updated: September 17, 2016 00:21 IST

सातुर्णा परिसरातील ‘रघुवीर’ प्रतिष्ठानच्या मुख्य कारख्यान्यावर अन्न व प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी धाड टाकली.

शो कॉज’ नोटीस बजावली : सातुर्ण्यात एफडीएची सलग दुसऱ्या दिवशीही कारवाई अमरावती : सातुर्णा परिसरातील ‘रघुवीर’ प्रतिष्ठानच्या मुख्य कारख्यान्यावर अन्न व प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी धाड टाकली. एफडीएने सलग दुसऱ्या दिवशी ही कारवाई केली आहे. ‘रघुवीर’च्या कचोरीत अळी आढळल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केल्यानंतर गुरूवारी अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाम चौकातील ‘रघुवीर’ प्रतिष्ठानवर धाड टाकून येथील ‘रॉ मटेरियल’ जप्त करून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले होते. सलग दुसऱ्या दिवशीही एफडीएच्या अधिकाऱ्यांनी रघुवीरच्या कारखान्याची पाहणी केल्याने ‘रघुवीर’च्या संचालकांचे धाबे दणाणले आहेत. शुक्रवारी एफडीएच्या अधिकाऱ्यांनी मिठाईचा आणखी एक नमुना जप्त करून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविला. जप्त केलेल्या नमुन्यांची संख्या आता चार झाली आहे. शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या दरम्यान एफडीएचे अन्न व सुरक्षा अधिकारी विश्वजीत शिंदे व भाऊसाहेब वाकडे हे सातुर्णा परिसरातील कारखान्यात पोहोचले. त्यांनी सुमारे दोन तासकारखान्याचा परिसर व तेथील कामकाजाची आणि साहित्याची तपासणी केली. अंबानगरीत ठिकठिकाणी असलेल्या ‘रघुवीर’ प्रतिष्ठानांसाठी लागणारा पेढा, मिठाई, खवा व ईतर मिष्ठान्न सातुर्ण्यातील कारखान्यात तयार करुन ते इतर प्रतिष्ठानांना पुरविले जातात. संचालकाचे धाबे दणाणलेअमरावती : खाद्यपदार्थाचे प्रतिष्ठान किंवा कारखाना थाटताना एफडीएचा परवाना घेताना ठरवून दिलेले नियम व अटी आणि इतर मापदंडांचे पालन केले जाते की नाही, कमी दर्जाच्या भेसळयुक्त खव्याचा वापर मिठाई व पेढा तयार करताना होत आहे का? ज्याठिकाणी अन्न पदार्थ तयार केले जातात त्याठिकाणी स्वच्छता आहे की नाही, याची तपासणी एफडीएच्या अधिकाऱ्यांनी केली. या कारवाईमुळे ‘रघुवीर’च्या संचालकांचे धाबे दणाणले आहेत. जप्त केलेल्या साहित्याचे नमुने सदोष आढळल्यास कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.