शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात पदवीसाठी पायपीट

By admin | Updated: June 24, 2017 00:06 IST

पदवीदान समारंभ आटोपल्यानंतर एका महिन्याच्या आत विद्यार्थ्यांना पदवी मिळणे अपेक्षित आहे.

मनुष्यबळाचा अभाव : तीन महिन्यांपासून विद्यार्थी वंचित, प्रशासनाचे दुर्लक्षलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पदवीदान समारंभ आटोपल्यानंतर एका महिन्याच्या आत विद्यार्थ्यांना पदवी मिळणे अपेक्षित आहे. मात्र तीन महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही विद्यार्थ्यांना पदवी मिळत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. परीक्षा विभागात पदवी देण्यासाठी कर्मचारी नाही, हे मूळ कारण असल्याची सत्यता आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या नामुष्कीने विद्यार्थ्यांना पदवीसाठी पायपीट करावी लागत आहे.विद्यार्थ्यांना पदवी मिळण्यासाठी विद्यापीठाच्या परीक्षा विभागअंतर्गत पदवी वाटप कक्ष आहे. या कक्षातून पदवी दिली जाते. त्याकरिता कर्मचारी देखील नियुक्त करण्यात आले आहे. मात्र मार्च महिन्यात महाविद्यालयीन विभागातून पदवी वाटप कक्षात बदली झालेले के.बी.पाटील हे अद्यापही पदवी वाटप कक्षात रुजू झाले नाही. त्यामुळे पदवी वाटप प्रक्रिया रेंगाळली आहे. पदवी मिळावी, यासाठी पाचही जिल्ह्यांतील विद्यार्थी विद्यापीठ गाठतात. मात्र, या कक्षात संबंधित कर्मचारी रुजू झाले नाही, अशी बतावणी करून विद्यार्थ्यांना पदवीविनाच आल्यापावली परतावे लागत आहे. दरदिवसाला ४० ते ५० विद्यार्थी हे पदवी मिळावी, यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात येतात. परंतु पदवी वाटप कक्ष कायम बंद असल्याने विद्यार्थ्यांना परत जावे लागते. तीन महिन्यांपासून पदवी वाटप कक्ष बंद असताना ते कसे सुरु करता येईल, याचे नियोजन करण्यात विद्यापीठ प्रशासन अपयशी ठरले आहे. आस्थापना विभागाने के.बी. पाटील यांची पदवी वाटप कक्षात बदली केली असेल तर ते तीन महिन्यांपासून का रुजू झाले नाही? याची चौकशी वजा शहानिशा झाली पाहिजे, हेसुद्धा महत्त्वाचे आहे. परीक्षा विभागात सुमारे चार हजार पदवी वाटपाच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती आहे. पदवी वाटपासाठी एक कर्मचारी मिळत नसेल तर चार हजार विद्यार्थ्यांना वेठीस धरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आतापर्यंत कारवाई का करण्यात आली नाही, हेदेखील महत्त्वाचे आहे. विद्यापीठाने १० मार्च २०१७ रोजी कर्मचाऱ्यांना प्रशासकीय कारणास्तव बदल्या केल्या होत्या. यापैकी किती कर्मचारी बदलीच्या जागी रुजू झाले नाही, याचा आढावा कोणीही घेतला नाही, अशी माहिती समोर आली आहे.पदवी वाटप केंद्रातील कर्मचाऱ्याची बदली झाली आहे. त्याजागी नवीन कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा आहे. मात्र वैयक्तिक स्तरावर पदवीसाठी कोणी विद्यार्थी आल्यास त्याला अन्य कर्मचाऱ्यांच्या हस्ते पदवी वाटप केली जात आहे.- जयंत वडते,संचालक, परीक्षा मंडळ