शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

अन्न औषधी प्रशासनाच्या ‘दिव्या’खाली अंधार

By admin | Updated: May 29, 2014 23:28 IST

शासनाच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यात गुटखा विक्रीवर बंदी असताना शहरातील काही पानटपर्‍यांसह चक्क अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या कार्यालयासमोरच गुटख्याची राजरोस विक्री होत असल्याचे

कार्यालयासमोरच गुटख्याची राजरोस विक्री : अधिकार्‍यांचे दुर्लक्ष, पुरवठादार बिनधास्त पुरवतात मालप्रसन्न दुचक्के - अमरावतीशासनाच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यात गुटखा विक्रीवर बंदी असताना शहरातील काही पानटपर्‍यांसह चक्क अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या कार्यालयासमोरच गुटख्याची राजरोस विक्री होत असल्याचे वास्तव मंगळवारी ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आपरेशनदरम्यान पुढे आले.गुटख्याच्या सेवनामुळे होणार्‍या दुष्परिणामांच्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाच्या आदेशानुसार अन्न सुरक्षा आयुक्तांनी १९ जुलै २0१२ रोजी संपूर्ण राज्यात गुटखाबंदीचे आदेश एक वर्षासाठी जारी केले होते. गुटख्यासह सुगंधी सुपारी, तंबाखू, पानमसाला, नागपुरी खर्‍र्याचे दुष्परिणाम लक्षात घेता आयुक्तांनी १८ जुलै २0१३ रोजी गुटख्यावरील कायमस्वरूपी बंदीचे आदेश जारी केले. परंतु बंदी आदेश झुगारून अनेक ठिकाणी गुटख्याची अवैध विक्री दुपटीच्या भावात सुरू आहे. शहरातील काही पानटपर्‍यांवर तर खुलेआम गुटख्याची विक्री होते. काही पानटपरी चालकांनी तर ‘हद्द’च सोडल्याचे दिसते. बसस्थानक मार्गावरील अन्न व औषधी प्रशासन कार्यालयापासून हाकेच्या अतंरावर काही पानटपरी चालक राजरोसपणे गुटखा विकत आहेत. ‘लोकमत’ने मंगळवारी याबाबत स्टिंग ऑपरेशन केले. त्यामध्ये अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या ‘दिव्या’खालीच अंधार असल्याचे वास्तव समोर आले.मंगळवारी सायंकाळी ६ वाजता ‘लोकमत’ प्रतिनिधी अन्न व औषधी प्रशासन कार्यालयासमोर पोहोचले. यावेळी कार्यालयाशेजारी असणार्‍या काही पानटपर्‍यांवर त्यांना गुटखा, खर्रा व विविध पान मसाल्यांच्या पुड्यांची सर्रास विक्री होत असल्याचे दिसून आले. संबंधित पानटपरी चालक गुटख्याची दुप्पट भावाने विक्री करीत होते. हा गोरखधंदा चक्क अन्न, औषधी प्रशासन विभागाच्या कार्यालयासमोर सुरु होता, हे विशेष. याबाबत संबंधित अधिकार्‍यांना विचारणा केली असता अवैध गुटखाविक्रीवर कारवाई सुरु असल्याचे उत्तर मिळाले. एकीकडे संपूर्ण जिल्ह्यात अन्न औषधी प्रशासनाकडून कारवाई सुरु असली तरी थेट या विभागाच्या कार्यालयासमोरच अवैध गुटखाविक्री सुरु आहे. अधिकारी निमूटपणे हा तमाशा पाहात आहेत. त्यामुळे हा चर्चेचा विषय बनला आहे. पोलिसांचेही दुर्लक्षशहरातील पानटपर्‍यांवर गुटख्याची राजरासपणे विक्री सुरु असताना अन्न व औषधी प्रशासनाप्रमाणेच पोलिसही निमुटपणे मुकदर्शक बनून हा तमाशा पाहत आहेत. यापूर्वी पोलिसांनी शहरातील अनेक गुटखा व्यावसायिकांवर कारवाई केली. परंतु ही कारवाई थातुरमातुर व पक्षपातपूर्ण असल्याची चर्चा शहरात सुरु आहे. लहान व्यावसायिकांना टार्गेट करून  बड्या माशांना आश्रय दिला जात असल्याने गुटख्याचा हा काळाबाजार खुलेआम सुरु असल्याचे दिसून येत आहे.