शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

संतापले लोकशाहिरांचे अनुयायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 23:27 IST

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी दिनाच्या ऐन पूर्वपहाटेला लोकशाहिरांच्या पुतळ्यासाठीचे सिमेंट स्तंभ बेमालूमपणे मोडून काढण्यात आल्याने मातंग व बहुजन समाजबांधवांनी अचानक पोलीस आयुक्तालयावर मोर्चा नेला. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली.

ठळक मुद्देलोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचा मुद्दापोलीस आयुक्तालयावर शेकडोंच्या संख्येने धडकगर्ल्स हायस्कूल चौकात आंदोलकांचा ठिय्याठाणेदार मनीष ठाकरे यांच्या निलंबनाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी दिनाच्या ऐन पूर्वपहाटेला लोकशाहिरांच्या पुतळ्यासाठीचे सिमेंट स्तंभ बेमालूमपणे मोडून काढण्यात आल्याने मातंग व बहुजन समाजबांधवांनी अचानक पोलीस आयुक्तालयावर मोर्चा नेला. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली. पोलीस आयुक्तालय तसेच वर्दळीच्या गर्ल्स हायस्कूल चौकात दिवसभर तणावाचे वातावरण होते. मोठा पोलीस ताफा तैनात करण्यात आला होता.अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासाठी गर्ल्स हायस्कूलच्या आवारात सिमेंट काँक्रीटचे स्तंभ उभारले गेले होते. अण्णाभाऊ साठे यांच्या १८ जुलै रोजी पुण्यतिथीनिमित्त त्याजागी प्रतिमापूजन करण्याचा मानस समाजबांधवांचा होता. सर्व जण त्या तयारीत असताना ते स्थळ उद्ध्वस्त केल्याची वार्ता समाजबांधवांमध्ये मंगळवारी सकाळी वाऱ्याच्या वेगाने पसरली. मोठ्या संख्येने समाजबांधव कुटुंबीयांसह घटनास्थळी एकत्र आले. गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांच्या पुढाकारामुळे हे घडल्याची भावना उपस्थितांची झाली. त्यामुळे ठाकरे यांच्या निलंबनाची मागणी घेऊन तो जत्था पोलीस आयुक्तालयावर धडकला. तिनेक तासांनी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी संतप्त मातंग बांधवांशी चर्चा केली. ठाणेदारांचे निलंबन आणि तोडलेले बांधकाम पूर्ववत बांधून देण्याची मागणी करण्यात आली. तसे निवेदनही देण्यात आले.सीपींचे शांततेचे आवाहनपुण्यतिथी महोत्सव नेहमीप्रमाणे गर्ल्स हायस्कूल चौकात पार पाडण्याची अनुमती पोलीस आयुक्तांनी दिली. त्यामुळे आंदोलक काहीसे शांत झाले. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे आणि शांतता राखणे आवश्यक असल्याचा सल्ला पोलीस आयुक्तांनी आंदोलकांना दिला. पोलीस आयुक्तांनी स्थिती संवेदनशीलपणे हाताळल्याने आंदोलकांनीही शांततेची भूमिका घेतली. मानवी हक्क अभियानाचे कार्याध्यक्ष दादासाहेब क्षीरसागर, लहुजी शक्ती सेनेचे रुपेश खडसे, भीम आर्मीचे मनीष साठे, बंटी रामटेके, माजी नगरसेवक सुदाम बोरकर, प्रभाकर वाळसे, सुरेश स्वर्गे, गणेशदास गायकवाड, राजा हातागडे, अनिल सोनटक्के, सागर कलाने, पंकज जाधव, गौरव गवळी, कैलास स्वर्गे, दिलीप आमटेंसह शेकडो बांधव उपस्थित होते.पोलिसांची तारांबळगर्ल्स हायस्कूल चौकात शेकडोंच्या संख्येने जमलेल्या समाजबांधवांनी घोषणाबाजी सुरू केल्यानंतर पोलिसांची तारांबळ उडाली. संतप्त समाजबांधवांनी थेट पोलीस आयुक्तालयावर धडक दिली. कमांडोज्च्या तगड्या बंदोबस्ताने त्यांना तेथे रोखले. नंतर काहींना आत प्रवेश देण्यात आला. समाजबांधवांनी पुन्हा गर्ल्स हायस्कूल चौकात एकत्र येऊन ठिय्या दिला. यात महिला, मुलांचीही संख्या उल्लेखनीय होती. दोन्ही ठिकाणी पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.ठाणेदार मनीष ठाकरे यांनीच या प्रकरणात अनावश्यक घाई केली. जागा कुणाच्या मालकीची आहे, याची खातरजमा त्यांनी केली नाही. समाजबांधवांना विश्वासात घेतले नाही. त्यांना निलंबित करेपर्यंत लढा सुरू राहील.- रूपेश खडसेविदर्भाध्यक्ष, लहुजी सेनापुतळ्यासाठीचे कॉलम मोडल्याने आमच्या भावना दुखावल्या. पोलीस आयुक्तांनी गाडगेनगर ठाणेदारांच्या चौकशीचे आश्वासन दिले. बुधवारी गर्ल्स हायस्कूल चौकात पुण्यतिथीसाठी समाजबांधव एकत्र येतील.- दादासाहेब क्षीरसागरराज्याध्यक्ष, मानवी हक्क अभियानअण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसविण्याचा मुद्दा न्यायप्रविष्ट आहे. त्यासंबंधाने निवेदन प्राप्त झाले. शांत राहण्याचे आश्वासन मातंग व बहुजन समाजबांधवांनी दिले आहे. नेहमीप्रमाणे पुण्यतिथी कार्यक्रम गर्ल्स हायस्कूल चौकात त्यांना घेता येईल.- दत्तात्रय मंडलिकपोलीस आयुक्त.सदर प्रकरण उच्च न्यायालयात प्रविष्ट आहे. न्यायालयाच्या परवानगीशिवाय काहीच न करण्याचे आदेश आहेत. जिल्हा परिषदेचाही जागा हस्तांतरणाचा ठराव नाही. त्यामुळे नियमबाह्य बांधकामाबाबत आम्ही तक्रार दिली.- मनीषा खत्रीसीईओ, जिल्हा परिषदगर्ल्स हायस्कूल जागेच्या मालकीसंदर्भात काहीही माहिती नाही. जागेचा सातबारा बघूनच ते स्पष्ट होईल. मध्यंतरी निवासी उपजिल्हाधिकाºयांनीदेखील जागेबाबत विचारणा केली होती.- एस.बी. खंडागळेप्रभारी उपसंचालक, शिक्षण विभागशासकीय अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार मी कायदेशीर कारवाई केली. सदर प्रकरण उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयाचा 'स्टेटस को' आहे. मोडतोडीशी माझा संबंध नाही.- मनीष ठाकरेपोलीस निरीक्षक, गाडगेनगर.