शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

चिखलदऱ्यात भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 22:10 IST

उन्हाळा लागताच चिखलदरा तालुक्यातील आदिवासी पाड्यातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. धारणी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे नऊ गावात टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रस्ताव पडून आहेत. कोरड्या विहिरीत एकापाठोपाठ एक बकेट टाकण्यासोबत आदिवासींची नदी-नाल्यात भटकंती सुरू झाली आहे.

ठळक मुद्देमेळघाटात पाणी पेटले : आदिवासींची भटकंती, नऊ गावांत टँकरचा प्रस्ताव

नरेंद्र जावरे।लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : उन्हाळा लागताच चिखलदरा तालुक्यातील आदिवासी पाड्यातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. धारणी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे नऊ गावात टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रस्ताव पडून आहेत. कोरड्या विहिरीत एकापाठोपाठ एक बकेट टाकण्यासोबत आदिवासींची नदी-नाल्यात भटकंती सुरू झाली आहे.चिखलदरा तालुक्यात कोट्यवधी रुपयांच्या पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आल्या असल्या तरी सखल उंच पठारावर वसलेल्या आदिवासी पाड्यांमध्ये स्वातंत्र्याच्या ७२ वर्षांनंतरही उन्हाळ्यात टँकरनेच पाणीपुरवठा केला जात असल्याचे वास्तव आहे.चिखलदरा शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. पाणी साठवून ठेवण्यासाठी आदिवासींकडे मुबलक भांडी नाहीत. साठविलेले पाणी संपल्यानंतर पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण होते. अशा स्थितीत पठारी भागातून पाण्याच्या स्त्रोतापर्यंत पायीच डोक्यावर भांडी घेऊन ये-जा करावी असल्याने मोठी कसरत होत आहे. तालुक्यातील आदिवासी पाड्यांमध्ये असलेले हातपंप जलपातळी खाली गेल्याने नादुरुस्त व कोरडे पडले आहेत. उन्हाळ्यात हातपंप दुरुस्तीपथक वाढविण्याची मागणी आदिवासींनी केली आहे. दुसरीकडे सार्वजनिक व पाणीपुरवठा करणाºया अन्य विहिरींचे खोलीकरण करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य सुनंदा काकडे यांनी केली आहे.आदिवासी गावांमध्ये पाणीपुरवठा करणाºया विहिरींच्या खोलीकरणासाठी ब्लास्टिंगची परवानगी आवश्यक आहे. पाणी जीवनाश्यक असल्याने प्रशासनाने ती परवानगी देण्यासह मुख्यालयी न राहणाºया ग्रामसेवकांवर कारवाई करण्याची मागणीसुद्धा केली आहे.विहिरी अधिग्रहित, कायमस्वरूपी उपाययोजना हव्यातचिखलदरा तालुक्यातील नऊ गावांमध्ये पहिल्या टप्प्यात टँकरने तत्काळ पाणीपुरवठा करण्याचे प्रस्ताव ग्रामपंचायतमार्फत तहसील कार्यालयाला व तेथून पुढे धारणी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात पाठविण्यात आले. तेथून मंजुरी मिळाल्यानंतर टँकरने पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्या गावांमध्ये पिपादरी, सोमवारखेडा, धरमडोह, बहाद्दरपूर, भिलखेडा, सोनापूर, कोयलारी, पाचडोंगरी आणि मनभंग या गावांचा समावेश आहे. पाणीपुरवठा टँकरने करण्यासाठी काही गावातून विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.नऊ गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. धारणी येथे उपविभागीय अधिकाऱ्यांकडे परवानगीसाठी पाठविण्यात आले आहे.- मनीष गायकवाड,तहसीलदार, चिखलदरापाण्याची पातळी खोल गेल्याने ब्लास्टिंगने विहिरीचे खोलीकरण करण्यात यावे, ग्रामसेवकांना मुख्यालयी राहण्याचे सक्तीचे आदेश असताना गैरहजर राहणाºयांविरुद्ध कारवाई करण्यात यावी.- सुनंदा काकड,सदस्य, जिल्हा परिषद