अमरावती : बंगालच्या उपसागरात तसेच आंध्र, आरोरी किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्यांच्याच सह्योगाने तीन किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. त्यामुळे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसह विदर्भावर ढगाळ वातावरण निर्माण झाले असून अनेक ठिकाणी पाऊससुध्दा पडला आहे. शनिवारपर्यंत विदर्भातील काही ठिकाणी पुन्हा पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असून अमरावती सकाळच्यावेळी धुकेसदृश स्थिती निर्माण झाली आहे. कोकण किनारा आणि दक्षिण गुजरात समुद्रात चक्राकार वारे सक्रिय झाले आहे. त्यामुळे विदर्भात ढगाळ वातावरण पहायला मिळत आहे. ढगाळ वातावरणामुळे विदर्भातील अनेक ठिकाणी पाऊससुध्दा पडला आहे. दोन दिवसांत सरासरी २३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून पुन्हा शनिवारपर्यंत पाऊस पडणार असल्याचे संकेत आहे. त्यातच एखाद्या ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे. शुक्रवारी कमाल २८ तर किमान १० डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून २३ मिलीमीटर पावसांची नोंद हवामान विभागाने घेतली आहे. पावसामुळे हवेत आर्द्रता निर्माण झाल्याने सकाळच्या वेळेत धुके सदृश स्थिती निर्माण झाली आहे.
अमरावती शहरावर धुक्याची चादर
By admin | Updated: January 3, 2015 00:21 IST