शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
3
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
4
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
5
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
6
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
7
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
8
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
9
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
10
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
11
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
12
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
13
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
14
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
15
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
16
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
17
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
18
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
19
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
20
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील

शेतकऱ्यांचा भरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2017 00:14 IST

स्थानिक बाजार समितीत रोज विक्री होणाऱ्या मालाचे चुकारे अडते करीत असताना खरेदीदाराकडून आठ ते दहा दिवस पेमेंट मिळत नाही.

अमरावती बाजार समितीचा लिलाव ठप्प : मालाची आवक ,विक्री मात्र नाहीलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्थानिक बाजार समितीत रोज विक्री होणाऱ्या मालाचे चुकारे अडते करीत असताना खरेदीदाराकडून आठ ते दहा दिवस पेमेंट मिळत नाही. या वादात तोडगा न निघाल्याने सोमवारी बाजार समितीमध्ये सहा हजार पोत्यांची आवक झाली, मात्र खरेदीदार पुढेच न आल्यामुळे लिलाव झालेच नाही. परिणामी या दोन घटकांच्या वादात शेतकरी नाहक भरडला जात आहे.अमरावती बाजार समितीत दररोज १० हजार पोत्यांची आवक होते. खरेदीदारांनी लिलावात माल खरेदी केल्यानंतर त्याचे चुकारे त्याच दिवशी अडते करतात. अडत्यांना आठ दिवसांनी खरेदीदार पेमेंट करतात, अशी प्रथा बाजार समितीत पूर्वापार सुरू आहे. अलीकडे मात्र खरेदीदारांचे चुकारे उशिरा होऊ लागले. खरेदीदारांनी अडत्यांना दिलेले धनादेश बाऊंस व्हायला लागलेत. परिणामी अडते व शेतकऱ्यांच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह लागले. त्यामुळे अडत्यांनी या वादावर तोडगा काढण्याची विनंती जिल्हा प्रशासन व बाजार समिती प्रशासनाला २४ मे रोजी निवेदनद्वारे केली आहे. त्यावर चर्चा करण्यात आली. यामध्ये १५ दिवसांत खरेदीदारांनी अडत्यांना चुकारे द्यायचे असे ठरले. मात्र यामध्ये अडत्यांचे समाधान न झाल्याने पुन्हा सोमवारी अडते व बाजार समिती प्रशासनाची बैठक झाली. यामध्ये खरेदीदार उपस्थित झाले नाहीत. तसेच बाजार समिंतीमध्ये आवक झालेल्या मालाच्या खरेदीसाठी खरेदीदार पुढे न आल्याने सोमवारी मालाचा लिलाव झाला नसल्याची माहिती अडत्यांनी दिली. दरम्यान सोमवारी आलेला सहा हजार पोते माल अडत्यांव्दारा सुरक्षित ठेवण्यात आले. ज्या शेतकऱ्यांना निकड होती, त्यांना काही प्रमाणात आर्थिक मदत अडत्यांव्दारा करण्यात आली. मात्र वादावर तोडगा न निघाल्याने सध्यातरी बाजार समितीचे लिलाव ठप्प झाले आहे.