शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत आज मोठी घसरण; १३ दिवसांत Gold ₹११,६२१ आणि Silver ₹३२,५०० नं झाली स्वस्त
4
“उडता भाला कशाला अंगावर घेता, आमचा प्रश्न निवडणूक आयोगाला, भाजपाला नाही”; मनसेची टीका
5
टॅक्स स्लॅबमध्ये मोठा बदल होणार? ५० लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर '३०% टॅक्स' नको; उद्योग संघटनेची मोठी मागणी
6
एका 'Kiss' नं रिक्षाचालकाला बनवलं सेलिब्रिटी; २ दिवस फाईव्ह स्टार हॉटेलला राहिला, त्यानंतर...
7
बांधकाम सुरू असलेला रेल्वे पुलावरून क्रेन कोसळली, वाहन चिरडली, दोघांचा जागीच मृत्यू
8
VIRAL : गालावर खळी, डोळ्यात धुंदी.. तरुणीने फारच मनावर घेतलं अन् पुढे काय केलं बघाच! व्हायरल होतोय व्हिडीओ
9
Groww IPO: डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
10
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
11
मोहम्मद अझरूद्दीन लवकरच घेणार मंत्रिपदाची शपथ; काँग्रेस त्याच्यावर इतकी 'मेहेरबान' का?
12
'इक्कीस'मध्ये अगस्त्य नंदासोबत झळकणारी अभिनेत्री कोण? अक्षय कुमारसोबत आहे कनेक्शन
13
हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बपेक्षा १०० पट पॉवरफूल; किती खतरनाक आहे रशियाचा पोसायडॉन? 
14
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
15
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
16
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
17
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
18
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
19
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
20
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर

सर्वधर्मीय सामुदायिक प्रार्थनेने वेधले सर्वांचे लक्ष

By admin | Updated: April 18, 2016 00:07 IST

विश्र्वव्यापी जगत् कल्याणी सर्वधर्मीय सामुदायिक प्रार्थनेने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले.

सामाजिक उपक्रम : गुरूदेव सेवा मंडळाचे आयोजन, हजारोंची उपस्थितीअमरावती : विश्र्वव्यापी जगत् कल्याणी सर्वधर्मीय सामुदायिक प्रार्थनेने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. स्थानिक पंचवटी चौकातील श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्रांगणात रविवारी सायंकाळी ही सामुदायिक प्रार्थना पार पडली. श्री गुरूदेव सेवाश्रम ट्रस्ट राधानगर, अमरावती जिल्ह्यातील सर्व गुरूदेव सेवा मंडळ आणि श्री गुरूदेव समन्वय समितीच्या संयुक्त विद्यमाने ही सामुदायिक प्रार्थना घेण्यात आली. या कार्यक्रमात भजन संध्या, सामुदायिक प्रार्थना, प्रबोधन, व राष्ट्रवंदना घेण्यात आली. सर्वधर्मीय प्रार्थना करून आत्मचिंतन व सामुदायिक नमस्कार तसेच श्री गुरूदेव, सर्व साधू संत व भारत मातेचा जयघोष करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरूण शेळके, तर स्वागताध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक सतीश तराळ तसेच प्रमुख अतिथी म्हणून महापौर चरणजितकौर नंदा, विभागीय आयुक्त ज्ञानेश्र्वर राजूरकर, विशेष पोलीस महानिरीक्षक संजीवकुमार सिंघल, जिल्हाधिकारी किरण गित्ते, पोलीस आयुक्त दत्रातय मंडलिक, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम, मनपा आयुक्त चंद्रकात गुडेवार, विजय ठाकरे, निरंजन गाठेकर, रवींद्र ठाकरे, खुशालसिंह परदेशी यांच्यासह अविनाश मोहरील, भदन्त सुमंगल महास्तवे, सुदर्शन जैन, हाफिज मसूद साहाब, झुबीन दोतीवाला, रूपेश डाबरे, सरदार हरबक्खसिंग कुगोवेजा, शरणपालसिंग अरोरा आदी सर्व धर्माचे प्रचारक उपस्थित होते. संत अंबादास महाराज कान्होली, रामधन महाराज दाभा, संत बंडोजी महाराज एकलारा, प्राजपिता ब्रम्हकुमारी, विश्व विद्यालयाच्या सीता दीदी यांचीही उपस्थिती होती. सृष्टीचा निर्माता एकच असून या देशात अनेक संस्कृ ती उदयास आल्यात. याची सुरूवात द्रविड संस्कृतीपासून आर्यसंस्कृती, ग्रिक संस्कृती व अन्य संस्कृती उदयास आल्या आहेत. सर्वधर्माची वेशभूषा, केशभूषा वेगवेगळी असली तरी सर्वांनी एकत्र येऊन सामुदायिक प्रार्थना केली पाहिजे, असा संदेश राष्ट्रसंतांनी सामुदायिक प्रार्थनेतून दिला आहे. राष्ट्रसंतांचे तत्त्व महत्त्वाचे असून आपण सर्व एक आहोत व एका अधिष्ठानात राहिले पाहिजे हा यामागील उद्देश असल्याचे मत आचार्य हरिभाऊ वेरूळकर नांदुरा यांनी व्यक्त केले. यावेळी इतर मान्यवरांनीही विचार मांडलेत. प्रास्ताविक मनोहर साबळे, राष्ट्रवंदना प्रकाश बोके, सामुदायिक प्रार्थना आचार्य हरिभाऊ वेरूळकर यांनी तर मनोगत, हभप भाष्कर विघे गुरूजी, हभप नामदेव महाराज गव्हाळे यांनी केले, तर समारोपीय भाषण हभप लक्ष्मण काळे महाराज यांनी केले. संचालन दिनेश मासोदकर यांनी केले. कार्यक्रमाला सर्वधर्मिय नागरिक व गुरूदेव सेवा मंडळाचे कायक़र्त्याचा सहभाग होतो. मनोज भिष्णूरकर, श्रीधर डहाके, ज्ञानेश्वर वानखडे, संजय तायडे, मधुकर केचे, शंकरराव वसू आदी उपस्थित होते.