शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

उड्डाणपुल बांधकामाचे भिजत घोंगडे

By admin | Updated: November 10, 2016 00:11 IST

: नरखेड रेल्वे क्रॉसिंगजवळील उड्डाणपुलाचे काम लवकरच पुर्णत्वास नेऊ असा शब्द संबंधित कंत्राटदाराने ....

बडनेरा मार्गावर वाहनधारकांचे हाल : कंत्राटदाराच्या मनमानीचा अतिरेकबडनेरा : नरखेड रेल्वे क्रॉसिंगजवळील उड्डाणपुलाचे काम लवकरच पुर्णत्वास नेऊ असा शब्द संबंधित कंत्राटदाराने खासदार आनंदराव अडसुळांना दिला होता. मात्र, उड्डाणपुलाचे काम अजून किती अवधी घेणार हा प्रश्न वाहनचालकांसाठी मन:स्तापाचा ठरत आहे. गेल्या चार वर्षांपासून कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे रस्त्याचे डांबरीकरण झाले नाही. अमरावती ते बडनेरा मुख्य मार्गावरील नरखेड रेल्वे क्रॉसिंग येथे गेल्या चार वर्षांपासून उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. हे काम अत्यंत मंद गतीने सुरू आहे. या मार्गावर वाहतुकीची सतत रेलचेल असते. बडनेऱ्यात रेल्वे जंक्शन असल्यामुळे येथून मोठ्या संख्येत रेल्वे गाड्यांची ये- जा राहते. पर्यायाने अमरावती शहरासह जिल्ह्यातील प्रवासी बडनेऱ्यातूनच प्रवास करतो. त्यामुळे अमरावती ते बडनेरा मार्गावर शहर बसेस, आॅटो इतर चारचाकी, दुचाकी वाहनांची गर्दी ही नित्याचीच बाब आहे. तसेच नियमित अमरावती ते बडनेरा येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. नरखेड रेल्वे क्रॉसिंगजवळचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. खड्ड््यांमध्ये बारीक गिट्टी टाकण्यात आली आहे. येथे वाहनांमुळे धुळच धूळ राहते. अशातच खराब रस्त्यांचा मोठा मनस्ताप वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. खासदार आनंदराव अडसुळ यांनी हा उड्डाणपुल लवकरच शहरवासिंयाच्या सेवेत सुरू होणार असल्याचे म्हटले होते. मात्र, अद्यापपर्यंत उड्डाणपुलाचे काम पुर्णत्वास गेलेले नाही. अजून किती अवधी लागणार असा प्रश्न पुढे आला आहे. या मार्गावरून मोठ्या संख्येत रुग्णवाहिका जात असताना या नादुरुस्त रस्त्याचा त्रास रुग्णांना सहन करावा लागत आहे. सदर कंत्राटदार थातुरमातूर रस्ता बनवून वेळ काढूपणाचे धोरण आखत असल्याचे चित्र आहे. चार वर्षात कंत्राटदाराने रस्त्याचे डांबरीकरण केले नाही. या रस्त्याचे त्वरीत डांबरीकरण करण्यात यावे, अशी सर्वसामान्यांची हाक आहे. आठवडा भरात रस्ता दुरुस्त केला नाही तर तीव्र आंदोलन करु, असा ईशारा सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ बनसोड, विलास वाडेकर यांनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)खासदारांनी पुन्हा घ्यावा पुढाकारनरखेड रेल्वे क्रॉसिंगजवळील उड्डाणपुलाचे काम लांबतच चालले आहे. गेल्या चार वर्षांपासून येथून नादुरुस्त रस्त्यांवरून वाहन चालकांना प्रवास करावा लागत आहे. याचा मोठा मन:स्ताप होत आहे. उड्डाणपुलाचे काम होईस्तोवर डांबरीकरणाचा रस्ता करण्यात यावा, अशी मागणी आहे. खासदार आनंदराव अडसूळ यांनीच यासाठी पुन्हा एकदा पुढाकार घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा, असेही बोलले जात आहे.