शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

शहर स्वच्छतेवर ‘फ्लार्इंग स्क्वॉड’चा वॉच !

By admin | Updated: March 20, 2017 00:06 IST

आठ लाख लोकसंख्येचा अमरावती महापालिका क्षेत्रातील स्वच्छतेवर ४३ पेक्षा अधिक अधिकारी - कर्मचाऱ्यांचा कटाक्ष राहणार आहे.

खळबळ : तपासणी पथकात अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश अमरावती : आठ लाख लोकसंख्येचा अमरावती महापालिका क्षेत्रातील स्वच्छतेवर ४३ पेक्षा अधिक अधिकारी - कर्मचाऱ्यांचा कटाक्ष राहणार आहे. १४ मार्चला महापौरांच्या अध्यक्षतेत झालेल्या वादळी बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. शहरात दैनंदिन साफसफाईच्या अनुषंगाने येणाऱ्या तक्रारींचा निपटारा व कामावर नियंत्रण ठेवण्याकरिता मनपा अधिकाऱ्यांचे तपासणी पथक नियुक्त करण्यात आले आहे. आयुक्त हेमंत पवार याने यासंदर्भात १५ मार्चला आदेश काढला असून स्वच्छतेच्या कामात हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा गर्भीत इशारा दिला आहे. जुन्या प्रभागातून ४३ प्रभागांतील साफसफाईच्या तपासणीकरिता दोन्ही उपायुक्तांसह कंत्राटी शहर अभियंता सहायक आयुक्त, अभियंते, शाखा अभियंते, कार्यकारी अभियंता, क्रीडाधिकारी, शिक्षणाधिकारी, पशुशल्यचिकित्सक, मुख्य लेखापरीक्षक, मुख्यलेखाधिकारी यांच्यासह विविध विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडेही तपासणीची जबाबदारी देण्यात आली आहे. या तपासणी पथकाकडे स्वास्थ निरीक्षक, सफाई कामगारांचे हजेरीची ठिकाणासह तपासणी अहवालाचा नमुना देण्यात आला आहे. एकूण १७ मुद्यांवर या तपासणी पथकाला दैनंदिन साफसफाईवर नजर ठेवायची आहे. तथा कंत्राटदाराच्या नावासह तपासणी अहवाल आयुक्तांकडे सोपवायचा आहे. या अधिकारी - कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून किमान दोनवेळा सकाळी ६ वाजेपासून प्रभागातील कामगारांची हजेरीबाबत तपासणी करावी व दैनंदिन साफसफाईच्या कामाबाबत पाहणी करावी. गैरहजर असलेल्या मनपा तसेच कंत्राटदारांचे कामगारांबाबत अहवाल संबंधित झोन कार्यालयाला पाठवावा, असे आदेश आयुक्तांनी पारित केले आहेत. (प्रतिनिधी)अशी होईल कारवाई कंत्राटदारांचे कामगार, मनपाच्या कामगारांची गैरहजेरी, कंत्राटदाराचे ५०० रुपयांप्रमाणे गैरहजर कामगार कपात, आवश्यक साहित्य नसल्यास २०० रुपयांप्रमाणे कपात, कन्टेनर बाजूला कचरा पडल्यास प्रतिकंटेनर १०० रु. कपात, गणवेश नसल्यास २०० रु. प्रति कामगार कपात, कंत्राटदाराकडे हजेरी रजिस्टर नसल्यास १०० रु. कपात, सुपरवायझर नसल्यास ५०० रुपये कपात, हायड्रोलिक आॅटो नसल्यास ५०० रुपये प्रति आॅटो कपात अशी तरतूद आहे.फौजदारी आणि ब्लॅकलिस्ट १४ मार्चला शहर स्वच्छतेबाबत महापौर आणि भाजप नगरसेवकांची बैठक वादळी ठरली. यात स्वच्छतेत हयगय करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी करण्याचे निर्देश देण्यात आले. तथा कामचुकारपणा करणाऱ्या कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या होत्या. त्या अनुषंगाने अधिकाऱ्यांचे तपासणी पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. या बाबीची होईल तपासणी कामगारांची उपस्थिती, आवश्यक साहित्य, घंटीकटले, हजेरी रजिस्टर, सुपरवायझर, गणवेश, हातगाड्या, डायरी, स्वास्थनिरीक्षक अािण बिप्युन आहे की नाही ही तपासणी व नागरिकांची स्वाक्षरी.