शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्तांनी थाटली जिल्हा कचेरी समोर राहुटी

By admin | Updated: August 27, 2014 23:13 IST

मागील आठ वर्षांपासून पूरग्रस्त पुनर्वसनासाठी लढा देणाऱ्या वलगाव आणि रेवसा येथील अन्यायग्रस्त पूरग्रस्तांनी बुधवारी जिल्हाकचेरीसमोर तुराटीच्या झोपड्या बांधून अभिनव आंदोलनला प्रारंभ केला आहे.

अमरावती : मागील आठ वर्षांपासून पूरग्रस्त पुनर्वसनासाठी लढा देणाऱ्या वलगाव आणि रेवसा येथील अन्यायग्रस्त पूरग्रस्तांनी बुधवारी जिल्हाकचेरीसमोर तुराटीच्या झोपड्या बांधून अभिनव आंदोलनला प्रारंभ केला आहे. वलगाव आणि रेवसा या गावालगत असलेल्या पेढी, रेणुका नदीला २००७ मध्ये महापुरांचा तडाखा बसून गावातील सुमारे ७०० कुटुंब प्रभावित झाले होते. घरे वाहून गेलीत, शेती खरडून निघाली. प्रचंड नुकसानीचा सामना गावकऱ्यांना करावा लागला होता. तेव्हापासून आजपर्यंत या पूरग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात आले नाही. वलगाव व रेवसा येथील पूरग्रस्तांचे पुनर्वसन त्वरित करावे, यासाठी प्रशासनासह शासनाकडे अनेकवेळा पाठपुरावा केला. पुनर्वसनाच्या मागणीसाठी अनेकदा आंदोलन करण्यात आले. मात्र या मागणीची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे बुधवारपासून अन्यायग्रस्त पूरग्रस्तांनी न्यायासाठी जिल्हाकचेरी समोर तुराटीच्या झोपड्या थाटून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. या आंदोलनात बसपचे प्रमोद तसरे, प्रशांत पाटील, शैलेश सुपारे, चंदू भगत राजेंद्र हजारे, रवींद्र पळसपगार, जगदीश भटकर, सुनील सावरकर, भारत तसरे, सत्यपाल रंगारी, रमेश तसरे, संदीप गेडाम, दीपक खोब्रागडे, अक्षय गजभिये आदी नागरिकांचा समावेश आहे.