शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

दर्यापूर तहसीलवर पूरग्रस्तांचा मोर्चा

By admin | Updated: July 3, 2014 23:19 IST

सात वर्षांपूर्वी अतिवृष्टीने महापूर येऊन तालुक्यातील १ हजार ५४४ कुटुंब बेघर झाले. शासनाने आतापर्यंत केवळ ३० कुटुंबांचे पुनर्वसन केले. मात्र ७० टक्के पुनर्वसन अद्यापही झाले नाही. पुनर्वसनाचे काम

दर्यापूर : सात वर्षांपूर्वी अतिवृष्टीने महापूर येऊन तालुक्यातील १ हजार ५४४ कुटुंब बेघर झाले. शासनाने आतापर्यंत केवळ ३० कुटुंबांचे पुनर्वसन केले. मात्र ७० टक्के पुनर्वसन अद्यापही झाले नाही. पुनर्वसनाचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी आमदार अभिजित अडसूळ यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.यावेळी आ. अडसूळ यांनी उपविभागीय अधिकारी सोहम वायाळ व तहसीलदार राहुल तायडे यांच्या समवेत प्रदीर्घ चर्चा केली. पूरग्रस्तांना आतापर्यंत घरे बांधण्यासाठी फक्त ५ कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीमध्ये केवळ ३० टक्केच पुनर्वसन झाले असून ७० टक्के पुनर्वसनाचे कार्य अपूर्ण आहे. ज्या ठिकाणी पुनर्वसन झाले त्या ठिकाणी रस्ते, नाल्या, वीज, पाणी आदी सोई पुरविण्यात आलेल्या नाहीत. पुनर्वसनग्रस्तांच्या समस्येवर तोडगा निघणार नाही, तोवर न हटण्याची भूमिका मोर्चेकऱ्यांनी घेतल्याने उपविभागीय अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत संपर्क साधला. जिल्हाधिकऱ्यांनी ही समस्या तातडीने निकाली काढण्याचे आश्वासन दिले. ठाकूर जमात ही अनुसूचित जमातींमध्ये मोडते. तत्कालिन उपविभागीय अधिकाऱ्यांनी ठाकूर जमातीच्या ११ लोकांना जात प्रमाणपत्र दिले. पण, महिनाभरापूर्वी दर्यापूर येथे रुजू झालेले प्रभारी उपविभागीय अधिकारी अग्रवाल यांनी नागरिकांच्या जात प्रमाणपत्र अर्जात त्रुटी काढून प्रमाणपत्र देता येणार नाही, असे सांगितले. त्यामुळे जात प्रमाणपत्रांअभावी या जमातीतील विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. या मुद्यावरही उपविभागीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली. पुनवर्सनाचा प्रश्न तातडीने निकाली न काढल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला. यावेळी तहसीलदार राहुल तायडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब हिंगणीकर, तालुकाप्रमुख देवीदास वाळके, नाना देशमुख, बाबाराव पाटील बरवट, पं.स. सभापती मंगला रहाटे, गटविकास अधिकारी थोरात, मोहित चांदुरे, भैया बरवट, सुधीर खांदे, राजू कराळे, रूपेश गणात्रा आदी उपस्थित होते.