नांदगाव तालुक्यात भेट : केंद्रीय पथकाकडून शेतीनुकसानाची पाहणीसंजय जेवडे - अमरावतीशेतीनुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाच्यावतीने आलेल्या चार सदस्यिय पथकाने नांदगांव खंडेश्वर तालुक्यातील जळू, टिमटाळा, सावनेर, शेलू नटवा या गावांना भेटी दिल्यात. शेतकऱ्यांच्याशी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या वेदनांचा जणू पूरच यावेळी समितीने अनुभवला. खरीप हंगामात झालेल्या कमी पर्जन्यमानामुळे आणि हवामानातील बदलामुळे खरीप पिकांचे तसेच फळपिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले. उद्भवलेल्या टंचाई सदृश्य परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे आर्थिक मदतीची मागणी केली होती. केंद्रीय पथकात प्रमुख आर.पी.सिंग यांच्या समवेत कृषि विभागाचे उपायुक्त चंद्रशेखर साहुकार, अन्न महामंडळाचे सहसंचालक सुधीरकुमार तसेच विजयकुमार बाथला यांचा समावेश होता. सर्वप्रथम पथकाने जळू गावातील अमोल भाकरे, दिगंबर साखरकर यांच्या शेतीस भेट दिली. तेथील तूर, कापूस, सोयाबीन पिकाचे झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. हवामान बदलामुळे पिकावर मोठ्या प्रमाणावर कीडीचा प्रादुर्भाव झाला, खरीपाचा पाऊस उशिरा आल्यामुळे पेरण्या लांबल्या. फुल, फळधारणा झाली नाही. जेमतेम १० टक्केच पीक आले, मशागतीवर मोठा खर्च झाला. आम्ही कर्जबाजारी झालो, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली. भरीव आर्थिक मदतीची जोरकसपणे मागणी रेटली. त्यानंतर लगेचच पथकाने टिमटाळा या गावी सरस्वती पाटील यांच्या शेतातील सोयाबीन, तूर तर विजय टेंबे यांच्या शेतीतील संत्रा बागेची पहाणी केली. या गावात कीडीमुळे जसे नुकसान झाले तसेच नुकसान रानडुक्कर, हरीण, नीलगाय आदी वन्यजीवांमुळेही झाले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या वेदनांचा पूर
By admin | Updated: December 16, 2014 22:42 IST