शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटातील आहार बंदवर लवकरच तोडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 22:05 IST

राज्यातील अंगणवाडी सेविका-मदतनीस यांनी सोमवारपासून त्यांच्या विविध मागण्यासाठी संप पुकारलेला आहे.

ठळक मुद्देकुपोषणात वाढ होण्याची भीती : पाचव्या दिवशीही आहार बंदच

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : राज्यातील अंगणवाडी सेविका-मदतनीस यांनी सोमवारपासून त्यांच्या विविध मागण्यासाठी संप पुकारलेला आहे. यामुळे मागील पाच दिवसांपासून जिल्हा आणि विशेषत: मेळघाटात वीस हजारांवर आदिवासी मुलांसह स्तनदा व गर्भवती मातांना दररोज दिला जाणारा आहार बंद आहे. त्यामुळे पूरक पोषणआहाराभावी बालकांच्या कुपोषणात वाढ होण्याची भीती वर्तविली जात आहे.उर्वरित जिल्ह्यांच्या तुलनेत मेळघाटची परिस्थिती वेगळी आहे. येथे पोषण आहार वितरण बंद राहिल्यास शासनाने चालविलेल्या कुपोषणमुक्तीच्या प्रयत्नांमध्ये अडसर निर्माण होऊन येथील कुपोषित बालके कुपोषणाच्या तिसºया व चौथ्या श्रेणीत जाऊन झपाटयाने कुपोषणात वाढ होणार आहे. मेळघाटचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यासाठी राज्यशासनासह जिल्हा प्रशासनाला विशेष दखल घेण्याची गरज आहेअत्यावश्यक सेवेसाठी तडजोड सुरूअंगणवाडीतील सेवा या माता आणि बालकांच्या आहार आणि आरोग्याशी संबंधित असल्यामुळे अत्यावश्यक सेवेत मोडतात. म्हणून या सेवा पुरविणे सेविका आणि मदतनीस यांच्यावर बंधनकारक आहे. राज्य पातळीवर याबाबत सकारात्मक पावले उचलली जात असून याबाबत लवकरच निर्णय अपेक्षित आहे. तर जिल्हा पातळीवरील संघटनेच्या नेत्यांशी देखील चर्चा करण्यात येत असल्याचे जिल्हा परिषदेचे महिला व बाल कल्याण अधिकारी कैलास घोडके यानी सांगितले. मेळघाटमधील अंगणवाडी सेविका व मदतनीसांसोबत सुद्धा चर्चा सुरू असून येथील बºयाच सेविका आणि मदतनीस ही बाब आहार आणि आरोग्याशी संबंधित अत्यावश्यक बाब असल्याने सेवा देण्यास तयार असल्याची माहिती आहे. बालविकास प्रकल्प अधिकारी अंगणवाडी सेविकांच्या सतत संपर्कात आहेत. येत्या एक-दोन दिवसांत जिल्हयातील हा प्रश्न मिटला नाही तरी मेळघाटात पूर्ववत आहार वितरण सुरू केले जाईलमेळघाटात दोन हजार कुपोषित बालकेअंगणवाडी सेविका व मदतनिसांनी सोमवारपासून बेमुदत संप पुकारला आहे.त्याचा सर्वाधिक फटका मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यातील कुपोषित बालकांसह गर्भवती माता व स्तनदा मातांना बसला आहे. धारणी व चिखलदरा तालुक्यातील दोन हजार बालके कुपोषित असून सहा हजार मध्यम श्रेणीत तर वीस हजारांवर बालके मध्यम श्रेणीत आहेत. सहा हजार गर्भवती व स्तनदा मातांचा आहार सुद्धा मागील पाच दिवसांपासून बंद आहे.पोषण आहाराबाबत मेळघाटचा प्रश्न गंभीर आहे सेविका आणि मदतनिस संघटनेसोबत बोलणी सुरू आहेत. लवकरच पुन्हा पोषण आहार सुरू करण्याचे प्रयत्न सुरु आहेत- कैलास घोडकेउपमुख्यकार्यपालन अधिकारी, मबाक अमरावती