शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

ध्वनीप्रदूषण केल्यास पाच वर्षे तुरुंगावास

By admin | Updated: February 18, 2017 00:13 IST

ध्वनीप्रदूषण केल्यास तब्बल पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागणार आहे.

तक्रारींसाठी टोल फ्री : व्हाट्स अ‍ॅपवर करा तक्रारअमरावती : ध्वनीप्रदूषण केल्यास तब्बल पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. पोलीस यंत्रणेने त्यासाठी अमरावतीकर नागरिकांना सजग केले आहे. पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ चे कलम १५ अन्वये यासंदर्भात गुन्हाही नोंदविण्यात येणार आहे. ध्वनीप्रदूषणाचे दुष्परिणाम समाजाच्या प्रत्येक घटकावर आता जाणऊ लागले असून हे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी लोकसहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. नागरिकांनी काही नियम पाळलेत, तर ध्वनीप्रदूषणाची तीव्रता कमी होऊ शकते. त्याअनुषंगाने ग्रामीण पोलीस यंत्रणेने ध्वनीप्रदूषणात तक्रारी स्वीकारण्यासाठी टोल फ्री क्रमांक १०० जाहीर केला आहे. याशिवाय अमरावती ग्रामीण पोलिसांच्या संकेतस्थळावरही ई-मेलद्वारे तक्रार करता येईल. अँड्राईड मोबाईल धारकांना ०७०३८६५६५४१ व ०७०३८६२२६५१ या व्हाट्स अ‍ॅप क्रमांकावर तक्रार दाखल करता येईल. ध्वनीप्रदूषण नियंत्रणाकरिता सर्व पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. या सर्व प्रभारी अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक ग्रामीण पोलिसांच्या ें१ं५ं३्र१४१ं’स्रङ्म’्रूी.ङ्म१ॅ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ध्वनीप्रदूषणाबाबत तक्रारी करण्याकरिता सर्व नगरपालिकांमध्ये टोलफ्री दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहे. विशेष म्हणजे निनावी तक्रारींवरसुद्धा कारवाई केली जाईल. (प्रतिनिधी) अशी होईल शिक्षाध्वनीप्रदूषण केल्यास पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ कलम १५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात येईल व त्यास पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा व १ लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते. तसेच शिक्षा होऊनसुद्धा असे गुन्हे चालू ठेवल्यास प्रत्येक दिवसाला ५ हजार रुपये दंडाची तरतूद आहे.याला आहे बंदीरात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत ध्वीक्षेपक, पब्लिक अ‍ॅड्रेस सिस्टीमचा उपयोग करता येणार नाही. तसेच लाऊडस्पिकर, फटाके, वाद्य वाजविण्यास उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. ध्वनीप्रदूषणावर (नियंत्रण नियमन) नियम २००० च्या कलम ३(१) आणि ४ (१) नुसार आवाजाच्या गुणवत्तेची मानके निश्चित केली आहेत. रुग्णालय, शैक्षणिक संस्था आणि न्यायालयाचे सभोवतालचे १०० मीटर पर्यंतचे क्षेत्र शांतता क्षेत्र राहील.