शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

मेळघाटात अवघ्या सहा महिन्यांत पाच वाघांची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 22:01 IST

मेळघाटात अवघ्या सहा महिन्यांत पाच वाघांची शिकार झाली असून, या शिकारी २०१७-१८ मधील आहेत. या सर्व शिकारी पूर्व मेळघाट वनविभागांतर्गत बफर क्षेत्रात घडल्या आहेत, तर एका वाघाची शिकार मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रांतर्गत कोअर क्षेत्रात २०१३ मध्ये घडली आहे.

ठळक मुद्देएका वाघाची शिकार पाच वर्षांपूर्वी : वाघांच्या शिकारीस मुख्य वनसंरक्षकांचा दुजोरा

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : मेळघाटात अवघ्या सहा महिन्यांत पाच वाघांची शिकार झाली असून, या शिकारी २०१७-१८ मधील आहेत. या सर्व शिकारी पूर्व मेळघाट वनविभागांतर्गत बफर क्षेत्रात घडल्या आहेत, तर एका वाघाची शिकार मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रांतर्गत कोअर क्षेत्रात २०१३ मध्ये घडली आहे.व्याघ्र प्रकल्पांतर्गत २०१३ मध्ये घडलेल्या शिकारीसंदर्भात काही पुरावे अधिकाऱ्यांच्या हाती लागले आहेत. हाती आलेले जैविक नमुने व्याघ्र प्रकल्प अधिकाºयांनी प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत. या वाघांच्या शिकारीस मुख्य वनसंरक्षकांनी दुजोरा दिला आहे.पूर्व मेळघाट वनविभागांतर्गत अंजनगांव वनपरिक्षेत्रातील खोंगड गावाच्या शेतीच्या बाजूला पहिला वाघ २०१७ च्या दिवाळीत, दुसरा वाघ २०१७ च्या हिवाळ्यात लाल मामा मंदिराजवळ, तिसरा वाघ २०१८ च्या होळीला गिरगुटीजवळ रक्षा नालानजीक, चौथा वाघ दहा महिन्यांअगोदर सचिन बेलसरे यांच्या शेताजवळ शिकाºयांनी मारला. पाचवा वाघ (बिबट) २०१८ मधील होळीच्या एक महिन्याआधी शंकर जामुनकर यांचे शेतात मारण्यात आला. आरोपी संजय उर्फ बंसीलाल हिरालाल जामुनकर (रा. गिरगुटी) यांचे बयानावरुन चौकशी अधिकाºयांना ही माहिती मिळाली. पूर्व मेळघाट वनविभागाचे सहायक वनसंरक्षक अशोक पºहाड यांच्यासमोर हे बयान नोंदविले गेले आहे.दरम्यान, मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत सन २०१३ मध्ये झालेल्या वाघाच्या शिकारीच्या अनुषंगाने चौकशी सुरु आहे. यात वनखंड ८६० मध्ये मुसळीची तस्करी आणि सायाळची शिकार ८ आॅगस्ट २०१८ ला घडली आहे.यात गिरगुटी येथील ३२ आरोपी आहेत. वनखंड ९४६ मध्ये १८ सप्टेंबर २०१८ ला सांबराची शिकार झाली. त्यात १३ आरोपी आहेत. वनखंड ९४५ मध्ये चांदी अस्वल आणि सायाळची शिकार २० सप्टेंबर २०१८ ला झाली आहेत.यात १२ आरोपी असून, या तिन्ही गुन्ह्यांत सानू तानू दारसिम्बे (रा. गिरगुटी) हा मुख्य आरोपी आहे. हे सर्व वनखंड मेळघाट व्याघ्र्र प्रकल्पाच्या चिखलदरा वनपरिक्षेत्रातील आहेत. यात चिखलदरा वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी प्रथम गुन्हा रिपोर्ट दाखल केला आहे.पुरावे अद्याप दूरचपूर्व मेळघाट वनविभागांतर्गत सहा महिन्यांत घडलेल्या पाच वाघांच्या हत्येसंदर्भात शिकार झालेले ठिकाण, अवयव व शिकारीसाठी वापरलेले हत्यार आदी पुरावे चौकशी अधिकाऱ्यांच्या हाती लागलेले नाहीत.